डेल कार्नेगी यांच्या अनेक पुस्तकांपैकी ‘हाउ टू विन फ्रेंड्स अॅण्ड इन्फ्लुअन्स पीपल’, ‘हाउ टू स्टॉप वरिंग अॅण्ड स्टार्ट लिव्हिंग’, ‘हाउ टू एन्जॉय युअर लाइफ अॅण्ड युअर जॉब’ ही पुस्तकं तुम्हाला तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील परिपूर्णतेचा आनंद मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत.
या पुस्तकांतून तुम्हाला खालील गोष्टी शिकायला मिळतील.
आपल्या व्यवसायात कार्यसंतुष्ट राहणं.
स्वत:ची बलस्थानं वृद्धिंगत करणं.
कंटाळा आणि नैराश्यावर मात करणं.
व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात समतोल साधणं.
आयुष्याला एक वेगळं वळण देणाऱ्या या पुस्तकाने जगभरातील लोकांना मदत केली आहे. ‘हाउ टू एन्जॉय युअर लाइफ अॅण्ड युअर जॉब’ हे पुस्तक तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाच्या यशस्वितेची गुरुकिल्ली आहे.