Skip to product information
1 of 2

Payal Book

How I Raised Myself from Failure to Success in Selling | मी विक्रीव्यवसायात अपयशाच्या खाईतून यशोशिखरावर कसा पोहोचलो by by FRANK BETTGER

Regular price Rs. 179.00
Regular price Rs. 199.00 Sale price Rs. 179.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publications
मी विक्रीव्यवसायात अपयशाच्या खाईतून यशोशिखरावर कसा पोहोचलो, हे फ्रॅंक बेटगर यांचे पुस्तक, प्रत्यक्ष अनुभवातून व प्रगल्भ निरीक्षण शक्तीतून उमललेले आहे. एका आंतरिक रेट्यातून व्यवसाय करीत असताना, जबरदस्त आत्मविश्वास व नेमकी दृष्टी फ्रॅंकला मिळत गेली. यातील काही सिद्धात हे खरोखरीच अपूर्व व आगळेवेगळे असून या सिद्धांताच्या आधारेच, सेल्समध्ये फ्रॅंकने सर्वोच्च यशोशिखर सर केले. अर्थातच या मागे फ्रॅंकचे अपार कष्ट आणि जिद्द आहे. खरे तर, डेल कार्नेगी यांच्या सांगण्यावरुन सेल्समधील अनुभवकथन लिहायला फ्रॅंक प्रवृत्त झाले. स्वत: डेल कार्नेगी म्हणतात की, सेल्सवर मी जी काही पुस्तके आत्तापर्यंत वाचली, त्यात सर्वात प्रेरणादायी आणि प्रभावी पुस्तक फ्रॅंक बेटगर यांचेच आहे. डेल कार्नेगी यांना जे वाटले, ते तुम्हालाही वाटू शकते. या पुस्तकातील सिद्धांताच्या आधारे तुम्हीही तुमच्या व्यवसायात यशोशिखर गाठू शकता! एकूणच, फ्रॅंक बेटगर यांच्या यशस्वीतेची ही पस्तीस वर्षांची कहाणी खरोखरीच आगळी वेगळी व चित्तथरारक आहे.
• उत्साहच्या अपार शक्तीनिशी केलेला कार्यप्रवास,
• भीतीवर विजय कसा मिळवावा,
• साशंक-संभ्रमावस्थेतील ग्राहकाशी संवाद कसा साधावा,
• ग्राहकाचा विश्वास जिंकण्याचे काही मार्ग,
• मुलाखत यशस्वी होण्यासाठी प्रश्न कसे व कोणते विचारावेत!
अशा एक अनेक युक्तीचे सिद्धांतच फ्रैंक बेटगर यांनी लिहिले आहेत. तुम्हाला ते निश्चितच प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही!