Payal Book
Hiranyadurg हिरण्यदुर्ग by संजय सोनवणी sanjay sonavani
Couldn't load pickup availability
Hiranyadurg हिरण्यदुर्ग by संजय सोनवणी sanjay sonavani
सातवाहन काळातील खिळवून ठेवणारी अकल्पित अद्भुतरम्य कथा !
हिरण्यदुर्ग... एक रहस्यमय किल्ला. हजारो वर्षांपूर्वीच दंतकथा बनलेल्या, गूढ आणि विस्मरणात गेलेल्या एका महान साम्राज्याची राजधानी. आता ते सातपुड्याच्या अभेद्य पर्वतरांगांच्या खाली, भूगर्भाच्या अथांग अंधारात दडलेले जिवंत विश्व!
भूगर्भातील पाताळगंगेच्या प्रवाहासोबत उलगडत जाणारा हा चित्तथरारक आणि अद्भुत अकल्पित प्रवास.
एके रात्री घनघोर अंधारात दोन अनोळखी तरुणांची अकस्मात भेट होते... आणि संघर्षातून सुरू होतो एक असा जीवघेणा प्रवास, जिथून परत येणं अशक्य वाटतं.
प्रत्येक पावलागणिक त्यांना भेटतात गहन संघर्षात अडकलेली पात्रं, नागवंशीयांची गूढ परंपरा, आणि अज्ञात ठिकाणावरून पृथ्वीवर स्थायिक झालेले विलक्षण मरुगण आणि लोकविलक्षण सुंदरी देवसेना!
दैवी शक्ती आणि अघोरी सामर्थ्य यांच्यातील रक्तरंजित संघर्ष, अपार महत्त्वाकांक्षा, घनघोर युद्धं आणि विश्वासघात यांच्या गुंतागुंतीतून उलगडत जातं एक समूळ हादरवणारं रोमहर्षक रहस्य!
या प्रवासात श्वास रोखून सामील व्हा! हा प्रवास तुम्हाला पाताळाच्या गर्भातून अनंताच्या सीमेपर्यंत नेईल... जिथे सत्य आणि दंतकथा यांच्यातील सीमारेषाच नाहीशी होते!

