Payal Books
Hippocrateschi Shapath हिपोक्रॅटिसची शपथ By Chandrakant Wagale डॉ. चंद्रकांत शंकर वागळे
Regular price
Rs. 310.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 310.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांत वैद्यकाचा इतिहास आवर्जून शिकवला जातोच असे नाही. या विषयावर भारतात फारच कमी लिखाण झाले आहे. मराठीतही काही लेखकांनी स्फुट स्वरूपाचे लेखन केले आहे. वैद्यकीय अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या विषयावर डॉ. चंद्रकांत वागळे यांनी बराच अभ्यास करून ‘वैद्यकाची यशोगाथा’ आणि ‘आत्मा ते जनुक’ ही दोन पुस्तके लिहिली. ‘हिपोक्रॅटिसची शपथ’ या पुस्तकात वैद्यकातील महत्त्वाचे चर्चाविषय आणि अजरामर संशोधनकार्य करूनही प्रकाशझोतात नसलेल्या पाश्चात्त्य आणि काही भारतीय संशोधकांची ओळख डॉ. वागळे यांनी करून दिली आहे. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरचे वर्तन कसे असावे याबद्दल प्रत्येक वैद्यकप्रणालीतील पूर्वसुरींनी काही नीतिनियम, बंधने, काही सूचना आपल्या लेखनातून मांडल्या आहेत. चरक, सुश्रुत या भारतीय आचार्यांनी आपापल्या संहितांमध्ये तर ग्रीसमधल्या हिपोक्रॅटिस या रोगोपचारकाने वैद्यक व्यावसायिकांनी पाळावयाची आचारसंहिता स्पष्टपणे नोंदवून ठेवली आहे. विशेषतः वैद्यकीय व्यावसायिकांना नीतिमत्तेची जाणीव करून देऊन वैद्यकाला उदात्त पातळीवर नेण्याचे कार्य हिपोक्रॅटिसने केले. हिपोक्रॅटिस आणि इतर संशोधकांनी वैद्यकशास्त्राची दिलेली नीतिमत्तेची ही आचारसंहिता या पुस्तकातून वाचकांसमोर येते. त्याचबरोबर वैद्यकाच्या इतिहासाचा माहितीपूर्ण अभ्यास करण्याचा प्रयत्न ह्या छोटेखानी पुस्तकातून डॉक्टर वागळे यांनी केला आहे. या पुस्तकामुळे वैद्यकशास्त्राकडे बघण्याचा एक सजग दृष्टिकोन वाचकांना मिळेल.
