PAYAL BOOKS
HIndutava, Marxvaad ani Bharat by Vijay Apte हिंदुत्व, मार्क्सवाद आणि भारत विजय आपटे Prashant Dixit प्रशांत दीक्षित
Couldn't load pickup availability
HIndutava, Marxvaad ani Bharat by Vijay Apte हिंदुत्व, मार्क्सवाद आणि भारत विजय आपटे Prashant Dixit प्रशांत दीक्षित
कोणतेही अस्तित्व निखळ चांगले किंवा निखळ वाईट नसते. प्रत्येक अस्तित्वाचा काही उद्देश असतो. शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या हिंदुत्व परिवार आणि मार्क्सवादी परिवारावरसुद्धा चांगल्या–वाईटाचे शिक्के बसले. स्वातंत्र्याचे उद्दिष्ट साध्य झाल्यावर काँग्रेस परिवार देशाच्या राजकारणात वैचारिक कोलांट्याउड्या मारत राहिला. काळाच्या ओघात काही पक्ष नाहीसे झाले, तर काहींचे अस्तित्व मर्यादित राहीले. अनेक चांगल्या संघटना आणि संस्था डबघाईला आल्या किंवा त्यांचे महत्त्व कमी झाले. पण हिंदुत्व परिवार आणि मार्क्सवादी परिवार यांनी त्यांची तत्त्वे आणि त्यांची कॅडर यांच्या बळावर ठाम उभे राहून, हातात सत्ता असताना व नसतानाही देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात महत्त्वाची भूमिका निभावली. हे दोन परिवार आणि भारत यांच्या राजकीय वाटचालीचा हा मागोवा.
