Skip to product information
1 of 2

Payal Books

HINDUS IN HINDU RASHTRA by Anand Ranganathan

Regular price Rs. 314.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 314.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

हिंदू राष्ट्रातील हिंदू!
(ICRR- Citizen Reporter)
मूळ पुस्तक - Hindus in Hindu Rashtra
लेखक:- आनंद रंगनाथन
मराठी अनुवाद:- डॉ ज्योत्स्ना कोल्हटकर,
डॉ प्राची जांभेकर

पुस्तकाचा विषय:-

डॉ आनंद रंगनाथन प्रख्यात लेखक आणि वक्ते आहेत. राष्ट्रवादी लेखक, विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. भारतात राहणाऱ्या हिंदू समाजाला टोकाच्या अल्पसंख्याकवादाने आजपर्यंत "थर्ड क्लास सिटिझन" अर्थात दुय्यम नागरिकाचा दर्जा दिलेला आहे त्याची विस्तृत चर्चा या पुस्तकात केलेली आहे.
दोन दिवसांपूर्वी विदेशमंत्री डॉ एस जयशंकर यांनी याच विषयावर बोलताना भारतात "सेक्युलॅरिझम" च्या आडून बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाची आजपर्यंत कशी ससेहोलपट झाली यावर मुलाखत दिली होती.

या पुस्तकात काश्मिरी हिंदू, अल्पसंख्यांक शाळांना राईट टू एकुकेशन मधून मिळणारी सुट, वक्फ बोर्डाची मनमानी आणि त्यांना दिलेली न्यायिक सवलत, धर्मस्थळ कायदा, हिंदूंवर केली जाणारी न्यायालयीन हुकूमशाही, शहाबानो घटस्फोट खटल्यात केली गेलेली कायदेशीर दुरुस्ती, मंदिरांवर राज्य सरकारने मिळवलेली बेकायदेशीर नियंत्रणे, टिपू सुलतान, बखतियार, बाबर यांच्या सारख्या हिंसक हिंदू विरोधी आक्रमकांना भारतात मिळणारा सामाजिक, राजकीय सन्मान अशी आठ प्रकरणे आहेत.

भारतात हिंदू म्हणून जन्माला येऊन काही पाप केलं का असा विचार करायला लावणारी संवैधानिक, कायदेशीर, सरकारी भेदभावाची व्यवस्था (Systemic constitutional, legal apartheid) स्वतंत्र भारतात आपणच करून ठेवलेली आहे. अल्पसंख्य समाजाला आर्थिक, न्यायिक सवलती, त्यांच्या संस्थांना विशेष दर्जा, त्यांच्या धार्मिक, सामाजिक विषयात अवलोकन आणि निवाडा करण्याची (Judicial Scrutiny) न्यायालयांना असलेली बंदी आणि सकारात्मक भेदभावाचा अतिरेक ( principle of positive discrimination) याची उदाहरणांसह भेदक चर्चा या पुस्तकात केली आहे.

मूळ पुस्तक अत्यंत वाचनीय आहेच आणि मराठी अनुवाद अतिशय अनुभवी अनुवादकांनी केलेला आहे त्यामुळे ओघवता आणि वाचनीय आहे. वाचावं आणि संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे.