सांपत्तिक श्रीमंती, तंत्रवैज्ञानिक कौशल्य, क्रीडा, कला, संस्कृती, बुद्धिवैभव, तत्त्वज्ञान, खगोल, पदार्थविज्ञान, गणित, अवकाश तंत्रज्ञान, औद्योगिक साम्राज्य, संगणक विज्ञान, वैद्यकशास्त्र... ज्ञानविज्ञानाचे असे एकही क्षेत्र नाही किंवा मानवी जीवनाचा असा एकही पैलू नाही ज्यामध्ये प्राचीन हिंदू चिंतनाने प्रगल्भता साध्य केलेली नाही.
राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या व अन्य उत्सवांपासून विद्यापीठांच्या पदवीदान समारंभांपर्यंत तसेच जागतिक धर्मपरिषदेपासून (ऑगस्ट 2000) विज्ञान-तंत्रज्ञानावरील परिचर्चांच्या व्यासपीठांपर्यंत सर्वत्र भारतीय/ पौर्वात्य क्षेत्रात हजारो वर्षांपूर्वी विकसित झालेल्या चिंतन आणि जीवनव्यवहाराचे गौरवपूर्ण दाखले दिले जाऊ लागले.