Payal Books
Hindu Rajacha ubhdav Utkarsha ani uchched by chintamani vaidy
Couldn't load pickup availability
हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास मुसलमानी अमदानीपर्यंत साधारणपणे मानला जातो. या प्राचीन इतिहासाचे ठोकळ रीतीनें तीन भाग पडतात. इतिहासाचे मुख्य साधन म्हणजे समकालीन लेख. हे लेख जितके भरपूर व विश्वसनीय असतील तितका इतिहास अधिक सुसंगत आणि पायाशुद्ध होतो. भरतखण्डाच्या प्राचीन इतिहासाचा पहिला भाग म्हणजे अतिप्राचीन काळापासून अलेक्झांडरची स्वारी होईपावे तोँचा होय. याची साधने थोडी असून हा इतिहासही अंधुक आहे. यास आर्यकाल म्हणता येईल. दुसरा भाग शिकंदराच्या स्वारीपासून हर्षापर्यंतचा म्हणजे सरासरीने इ. स. पू. ३०० पासून इ. स. ६०० पर्यंतचा. याकाळांत ग्रीक इतिहासकारांचे लेख तसेच अनेक शिलालेख व ताम्रलेख, नाणीं व इतर देशांतील इतिहास यांच्या साधनाने बऱ्याच विश्वसनीय रीतीनें इतिहास लिहितां येतो. व्हिन्सेटस्मिथ-प्रभूति इतिहासकारांनी तो लिहिला आहे. यानंतरचा तिसरा भाग म्हणजे हर्षापासून पृथ्वीराजापर्यंतचा काळ इ. स. ६०० पासून इ. स. १२०० पर्यंतचा असून या काळाचा इतिहास व्हिन्सेटस्मिथनें फारच त्रोटक लिहिला आहे. या इतिहासाची साधनें बरीच उपलब्ध झाली आहेत; तथापि या काळाचा समग्र हिंदुस्थानचा एकवटलेल्या दृष्टीने अद्याप कोणीहि इतिहास लिहिला नाहीं. असा इतिहास लिहिण्याचा माझ्या अल्पशक्तीप्रमाणे मी या पुस्तकांत प्रयत्न केला आहे.
