HIMALAYVASI GURU ANI ATINDRIY SHAKTI हिमालयवासी गुरू आणि अतींद्रिय शक्ती by Avanti wartak
आध्यात्मिक प्रवासातील संयोगांचे आकर्षक वर्णन -डॉ. करण सिंग, प्रख्यात विद्वान आणि माजी केंद्रीय मंत्री
प्रियाभिषेक शर्मा यांच्या आध्यात्मिक प्रवासात त्यांना आलेले विलक्षण अनुभव आणि घडलेले योगायोग हे अतिशय रंजक आहेत. मी ते खूप कुतूहलाने आणि आनंदाने वाचले आहेत. -डॉ. करण सिंग (प्रख्यात विद्वान आणि माजी केंद्रीय मंत्री) एका हिमालयवासी गुरूंनी विश्वविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणाला बीजमंत्र दिल्यानंतर दोन वर्षांनी एका मध्यरात्री तो तरुण उठून बसला. त्याला जाणवलं की, त्याचं मन हे दूरच्या जागा आणि माणसांशी जोडलं जातंय. भेदरलेल्या आणि भांबावलेल्या या तरुणाला लक्षात आलं की, त्याच्या अंतर्ज्ञानाची शक्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एवढंच नाही तर ब्रह्मांडातून काही गूढ आवाज त्यांच्या मेंदूत प्रवेश करत आहेत हेही त्याला जाणवलं. मनाची रहस्यं ध्यान आणि संन्यासी यांचा वेध घेत त्याचं आयुष्य कायमस्वरूपी पालटलं. अनेक हिमालयी गुरू चमत्कारिकरित्या त्याला मार्गात भेटत होते आणि विविध टप्प्यांवर त्याला मार्गदर्शन करीत होते. दोन दशकं ध्यानाच्या माध्यमातून स्वतःच्या मेंदूचं निरीक्षण केल्यानंतर, मनाचा एक एक पदर हळूहळू बाजूला सारत एके दिवशी त्याने विलक्षण मानसिक शांततेचा उदय होत असल्याचं अनुभवलं. शेवटी हा प्रवास एका चिरंजीव संन्याशाच्या चरणाशी येऊन पोहोचला. डॉ. प्रियाभिषेक शर्मा जीवनाचे साधक असून त्यांनी हिमाचल प्रदेश विश्वविद्यालय, शिमला येथून राज्यशास्त्र या विषयात डॉक्टरेट प्राप्त केली आहे. त्यांनी तब्बल दोन दशकं ध्यानाचा अभ्यास केला असून बराच काळ हिमालयातील योगींच्या गूढ़ विद्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचा शिष्य म्हणून त्यांच्या सान्निध्यात व्यतीत केला आहे. हे पुस्तक त्याच दोन दशकांच्या तपश्चर्येचं आणि त्या हिमालयी योगींच्या कृपेचं फळ आहे.