बेळगावसारख्या गावातून सातासमुद्रापारच्या अमेरिकेत गेलेला ‘ श्री ठाणेदार ’ नावाचा धडपड्या मराठी मुलगा ! कसा सामोरा गेला तो या परिस्थितीला ? कशी मात केली त्यानं या आव्हानावर ? परत एकदा त्यानं उभारी घेतली का ? वाचूया या प्रेरणादायी पुस्तकात...
लहानपणी जी गरिबी वाट्याला आली तिचा स्वीकार श्री ठाणेदार यांनी संकट म्हणून न करता आव्हान म्हणून केला आणि विजयाचे एक एक पाऊल पुढे टाकीत, ही संधी आर्थपुर्ण करीत हा मराठी मुलगा आज अमेरिकेतील एक यशस्वी उद्योगपती झाला. हे यश म्हणजे पैक्याला जोडून मिळवलेला पैका नव्हे: हे यश हा आत्मशक्तीचा सुंदर आविष्कार आहे. धडपड्णार्या मुलांपुढे डॉ. श्री. ठाणेदार यांचे जीवन हे दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवणारे आहे. हे पुस्तक मराठी तरूणाला नवा प्रकाश दाखवील, नवा आत्मविश्वास त्याच्या मनात निर्माण करील. या पुस्तकाचे प्रत्येक पान ही प्रकाशाची नवी वाट आहे.