Skip to product information
1 of 2

Payal Books

Helpata By Tanaji Dharane हेलपाटा तानाजी धरणे

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

Helpata By Tanaji Dharane हेलपाटा तानाजी धरणे

हेलपाटाच्या सहाव्या आवृतीच्या निमित्तानं .....!

    हेलपाटा  आज अडीच वर्षाची झाली
माझी " हेलपाटा " कादंबरीची पहिली आवृती ५ मार्च २०२३ रोजी इंगळी हातकणंगले जि . कोल्हापुर येथे ग्रामिण मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित झाली . तेंव्हा पासुन एकही दिवस मी हेलपाटा शिवाय जगलो नाही . हेलपाटा महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात तर पोहचली त्याशिवाय गुजरात , पंजाब व गोवा, तेलंगणा ,उत्तरप्रदेश  आंद्रप्रदेश , दिल्ली कर्नाटक राज्यातही पोहचली . याचा मनोमन आनंद होत आहे . हेलपाटा हा अनेकांच्या जगण्याचा एक भाग झाली त्यामुळे हेलपाटा वाचुन वर्षभर अनेक समिक्षकांनी हेलपाटावर भरभरुन लिहीले . गेली वर्षभर अनेक पेपरमध्ये सोसल मिडियावर हेलपाटाची परिक्षणे आली . समाजाच्या सर्वच स्तरातुन हेलपाटाचं खूप खूप कोतुक झालं . हेलपाटा वाचुन अनेकांनी अश्रू ढाळले . गेली वर्षभर फोन मेसेज व प्रत्यक्ष भेटुन अनेकांनी हेलपाटाबद्दल भरभरुन लिहिलं गेलं , बोललं  गेलं हे खरं हलपाटाचं यश आहे असे मला वाटते .हेलपाटाचा अनेक नामवंत संस्थांनी यथोचित असा साहित्य पुरस्कार देऊन गौरव केला . हेलपाटाला आत्तापर्यंत २० उत्कृष्ट कादंबरीचे पुरस्कार मिळाले मी त्या संस्थांचा ,मान्यवर परिक्षकांचा व वाचक चाहत्यांचा अतिशय ऋणी आहे . ज्यांनी हेलपाटाला एका वेगळ्या उंचीवर नेले . साहित्यिक  प्रकाश नावलकरांनी हेलपाटा अगदी कतारसारख्या देशात माघवून घेतली म्हणजे हेलपाटा अगदी साता- समुद्रापार पोहचली . गेली वर्षभर सतत चर्चेत असणारी हेलपाटा कादंबरीच्या शिरपेचात खरा मानाचा तुरा रोवला गेला तो क्षण म्हणजे " प्रा . श्री . धनंजय काळे यांनी पी एच डी संशोधन अभ्यासासाठी केलेली हेलपाटा ची निवड . " स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी PH.D संशोधन अभ्यासासाठी मराठी कादंबर्यातील तरुणांचा संघर्ष या विषयावर अभ्यासासाठी निवडलेल्या कादंबर्या साहित्य अकादमी  पुरस्कार प्राप्त कादंबरी ' बारोमास ' लेखक सदानंद देशमुख , काहिली लेखक .प्रा . डाॅ . अनंत राऊत . व्हायरस-रविद्र ठाकुर ,रहबर-रफिक सुरज , युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी फेसाटी -नवनाथ गोरे ,टिश्युपेपर -रमेश रावळकर ,वाॅटेड-वामन जाधव,वांझ-मिलिंद कांबळे , हेलपाटा - तानाजी धरणे ,फिरकी -बाळासाहेब भडकवाड या दहा लेखकांच्या दहा कादंबर्यावर phd संशोधन होत आहे .  तसेच भारतरत्न डाॅ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छञपती संभाजीनगर  येथे उज्वला मगर यानी phd  संशोधनासाठी ज्या दहा कादंबर्या निवडल्या आहेत त्यात हेलपाटा आहे . हेलपाटा या   दोन विद्यापीठात हेलपाटा  phd संशोधन अभ्यासासाठी आहे हे मनाला खुप सुखावणारी बाब आहे . त्याबद्दल संशोधक प्रा . श्री . धनंजय  उद्धवराव काळे  सर,मार्गदर्शक -प्रा .डाॅ .हंसराज दत्ताञय भोसले सर व नांदेड विद्यापीठ प्रशासन  यांचे मन:पूर्वक आभार .हेलपाटा कादंबरीच्या पहिल्या आवृतीसाठी मोलाचे सहकार्य लाभलेले व हेलपाटा कादंबरीचे मुखपृष्ठ रेखाटणारे शिरिष घाटे सर , मुद्रीत शोधन करणारे प्रा . डाॅ . आप्पा बुडके  सर  आदरणीय अर्जुन वेलजाळी सर, मार्गदर्शक व हेलपाटासाठी पाठराखन लिहिणारे ज्येष्ठ साहित्यिक पुर्वाध्यक्ष  उत्तम कांबळे सर ८४  वे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन  ठाणे  सन २०१० , आदरणीय प्रवीण दवणे सर , ज्येष्ठ मार्गदर्शक साहित्यिक बाबाराव मडावी सर,  लेखक नवनाथ गोरे सर , ज्येष्ठ साहित्यिक दत्ताञय मानुगडे सर ,मा.प्रा . डाॅ दिपक सुर्यवंशी सर , प्रा .डाॅ .नम्रता बागडे मॅडम .प्रा . अरुण कुलकर्णी सर. उस्मानिया विद्यापीठ हैद्राबाद.  माझे मनोबल वाढवणारे मा . शरद गोरे सर राष्ट्रीय अध्यक्ष  अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे .  आदरणीय मा . सुभाष देशमुख सर, मा .फोजमल पाखरे सर , मा . नामदेव पडवळ सर , मा . विष्णु संकपाळ सर , मा . यशवंत बेंद्रे सर ,प्रकाशक तान्हाजी  खोडे सर  ज्ञानसिंधु प्रकाशन  ,  या सर्वांचा व माझे वेळोवेळी मनोबल वाढवणारे मायबाप वाचक समिक्षक, माझा मिञपरिवार माझे धरणे कुटुंबिय माझी पत्नि व माझी मुले सर्व पञकार बांधव व वर्तमानपञे व हजारो चाहत्यांचे ऋण व्यक्त करतो. हेलपाटाची  सहावी आवृती येत आहे त्याबद्दल  ज्ञानसिंधु प्रकाशन नाशिक यांचे ही खुप खुप आभार . हेलपाटा नं लेखक म्हणुन मला एक वेगळी ओळख मिळऊन दिली त्याबद्दल मी स्वत:ला खुप भाग्यवान समजतो . पुन्हा एकदा हेलपाटा वर प्रेम करणार्या चाहत्यांना धन्यवाद देतो व थांबतो .
  जय हिंद .....!