Skip to product information
1 of 2

Payal Books

Healthy Raan bhajya by Ashwini Chothe

Regular price Rs. 215.00
Regular price Rs. 240.00 Sale price Rs. 215.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
पुस्तकाबद्दलची माहिती 
दरवर्षी ठराविक काळात रानात नैसर्गिक पद्धतीने उगवणाऱ्या रानभाज्यांपैकी काही विशिष्ट ऋतुपुरत्या मर्यादित असतात, तर काही वर्षभर येणाऱ्या असतात. आहारातून रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी या भाज्या अत्यंत उपयोगी ठरतात. परंतु, रानभाज्यांचा नेमका कोणता भाग उपयोगात आणायचा याचे एक खास तंत्र आहे. आदिवासींच्या जीवनाचा अपरिहार्य भाग असलेल्या या रानभाज्या रोजच्या जीवनात कशा वापरायच्या, त्यांचे औषधी उपयोग, मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यावयाचे असल्यास त्यांची लागवड कशी करावी, प्रत्येक रानभाजीची आदिवासी करीत असलेल्या पाककृती याबद्दल सविस्तर माहिती देणारे पुस्तक.  एग्रोवनमधील लोकप्रिय सदराचे पुस्तकरूप.  
 
लेखिका प्रा. अश्विनी अशोक चोथे यांच्याबद्दल
नाशिकमधील के. के. वाघ उद्यानविद्या महाविद्यालयात सहाय्यक अध्यापक म्हणून कार्यरत. बायफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च फौंडेशन, पुणे या मान्यवर संस्थेत फूड प्रोसेसिंग तसेच वन्यजीवांचे अन्नस्रोत याविषयी संशोधन. स्वतः आदिवासी भागात राहत असल्याने रानभाज्या आणि त्यांच्या विविध पाककृती याबद्दल परिपूर्ण माहिती.