Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Heal Your Gut Mind And Emotions (Marathi) By Dimple Jangda, Vikas Balwant Shukl(Translator) हील युवर गट माइंड ॲँड इमोशन्स

Regular price Rs. 250.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 250.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Heal Your Gut Mind And Emotions (Marathi) By Dimple Jangda, Vikas Balwant Shukl(Translator) हील युवर गट माइंड ॲँड इमोशन्स

तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याचा संबंध तुमच्या पचनसंस्थेशी आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तुमची पचनसंस्था जितकी निरोगी, तितके तुम्ही अधिक सुदृढ !

पचनसंस्थेला ऊर्जेचा केंद्रबिंदू मानून, आरोग्य प्रशिक्षक डिंपल जांगडा यांनी प्राचीन आयुर्वेदिक शास्त्र, आधुनिक संशोधन आणि पोषणशास्त्र यांचा प्रभावी संगम साधत जगभरातील असंख्य लोकांना जुनाट आजारांवर मात करण्यास मदत केली आहे. विशेषतः अन्नरसायनशास्त्रावर भर देत, त्यांनी आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोग उलटवण्यासाठी आहार कसा उपयोगी ठरू शकतो, याविषयी मार्गदर्शन केले आहे. या सर्वसमावेशक पुस्तकात त्यांनी त्यांच्या आयुष्याला आकार देणारी तत्त्वे आणि साधने सामाईक केली आहेत. तसेच, आहाराचा योग्य उपयोग करून आरोग्य टिकवण्याचा आणि आजारांना प्रतिबंध घालण्याचा मार्ग दाखवला आहे. त्यांनी पचनसंस्थेची प्रचंड क्षमता उघड करण्यासाठी आणि पचन व मेंदू यांच्यातील परस्परसंवाद सुधारण्यासाठी एक पाच पायऱ्यांची प्रक्रिया मांडली आहे. यामुळे शरीराला खरोखरच काय आवश्यक आहे, याची जाणीव होईल. डिंपल यांचा उद्देश लोकांना योग्य पोषणाच्या मदतीने आजार टाळण्यास सक्षम करणे हा आहे. या सर्वसमावेशक आणि सुलभ पुस्तकाद्वारे, त्यांनी हे कसे शक्य आहे, हे स्पष्टपणे दाखवले आहे.