He Sarva Aapalyala Kuthe Nenar By Arun Shourie
Regular price
Rs. 585.00
Regular price
Rs. 650.00
Sale price
Rs. 585.00
Unit price
per
``आग लागलेल्या घरात गडबड व गोंधळ माजतो. चौकीदार आणि इतर लोक आग विझवण्यात गुंतलेले असताना घरातील वस्तू चोरण्याची संधी चोर साधू शकतो... युद्धकाळात संकटाला तोंड देणारा किंवा घसरणीला लागलेला देश अगदी त्या आग लागलेल्या घरासारखा असतो. अशा स्थितीतील देशावर हल्ला केल्यास अध्र्या प्रयत्नात दुप्पट यश मिळते....`` – ‘THE WILES OF WAR’ ``जेव्हा अधिकायांमध्ये गटबाजी होते, प्रत्येक जण आपल्या मित्राला वर आणण्याच्या प्रयत्नात असतो, चांगल्या व हुशार लोकांना डावलून बदमाश लोकांच्या नियुक्त्या करतो, स्वत:च्या फायद्यासाठी लोकांकडे पाठ फिरवतो, सहकायांना बदनाम करतो; त्याला अंदाधुंदीचा ‘उगम’ म्हणतात. ``जेव्हा कारस्थानी दुष्ट लोकांना शक्तिशाली घराणी गोळा करतात, तेव्हा ते कोणतेही अधिकारपद नसतानासुद्धा प्रख्यात होतात आणि त्यांच्या ताकदीमुळे लोक चळाचळा कापतात. लोकांची बारीकसारीक कामे करून ते झाडाला विळखा घालणाया वेलीप्रमाणे त्यांना कायमचे अंकित करून घेतात; अधिकारपदावरील लोकांचे अधिकार बळकावून सामान्य माणसाला नाडतात. देशात गदारोळ माजतो, पण सरकारी मंत्री तो झाकून ठेवतात आणि त्याची माहिती देत नाहीत – ह्याला अंदाधुंदीचे ‘मूळ’ म्हणतात. ``जेव्हा चांगल्या लोकांना `चांगले` म्हणून मान्यता दिली जाते, पण त्यांना पदोन्नती दिली जात नाही; जेव्हा दुष्ट लोकांना ओळखूनसुद्धा बाहेर काढले जात नाही; जेव्हा भ्रष्टाचारी सत्तेत असतात आणि चांगल्या लोकांना देशोधडीला लावले जाते; तेव्हा देशाचे भयानक नुकसान होते.’’ – ‘THE BOOK OF THREE STRATEGIES’