Payal Books
Hasata Hasata by Mukund Taksale हसरी टाकसाळ
Couldn't load pickup availability
Hasata Hasata by Mukund Taksale हसरी टाकसाळ
टाकसाळे यांनी लोकप्रिय होताना लोकानुनय केलेला नाही. त्यांचे लेखन स्फोटक आहे, पण सनसनाटी नाही. बहुश्रुतता, सभ्यता आणि सुसंस्कृतता, प्रागतिक चिकित्सक दृष्टी, नित्य नूतनाचे स्वागत ही टाकसाळे यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत… तसे पाहिले तर वृत्तपत्रातील सदर लेखन तात्कालीक स्वरूपाचे असते, त्यातला आजचा ताजेपणा उद्या शिळा वाटू लागतो, परंतु टाकसाळे यांच्या या लेखनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे टाकसाळेंनी तात्कालीक वाटणाऱ्या विषयाच्या आत शिरून त्यातून प्रकट होणारे मर्म आणि वर्म अधोरेखित केले असल्याने त्या लेखनाला सार्वत्रिकता प्राप्त झाल्याचा अनुभव येतो. या लेखनातून टाकसाळे यांचा चौकसपणा, चौफेर दृष्टी आणि कल्पक आविष्कार यांचा प्रत्यय येत असल्यामुळे सदर लेखन हे ‘सदर लेखन’ म्हणून जरी निर्माण झाले असले, तरी त्याच्या पुढे जाऊन त्याला ललित लेखनाचा दर्जा प्राप्त झाला आहे. अविनाश सप्रे (प्रस्तावनेतून)
