Skip to product information
1 of 2

Payal Books

Hasari Taksal by Mukund Taksale हसरी टाकसाळ

Regular price Rs. 445.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 445.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Hasari Taksal by Mukund Taksale  हसरी टाकसाळ

हसरी टाकसाळ टाकसाळे यांच्या लेखनाचा अंतिम हेतू केवळ विनोद निर्मिती करणे हा आहे असे मला वाटत नाही, कारण वास्तवाकडे बघण्याची त्यांची म्हणून जी दृष्टी आहे, तिचा परिणाम म्हणून त्यांच्या लेखनातून विनोद निर्माण होत आलेला आहे. चेहऱ्यावरचा संभावितपणाचा बुरखा फाडून वाचकाला सत्य दर्शन घडवणे, ही लेखक म्हणून टाकसाळे यांची भूमिका आहे… … आधुनिकतेचे जे एक लक्षण उपहास, उपरोध आणि असंगतता हे आहे, त्यांचा पुरेपूर वापर टाकसाळे आपल्या कथांमधून करतात. त्या अर्थान टाकसाळे यांच्या कथा आधुनिक आहेत, पण या कथा सरसकटपणे ‘विनोदी कथा’ या सदरात ढकलल्यामुळे या कथांच्या मागे असणाऱ्या गांभीर्याकडे दुर्लक्ष होत आले आहे. खरे तर या कथा म्हणजे विसंगतीपूर्ण जगण्यावरचे कलात्मक भाष्य आहे. अविनाश सप्रे (प्रस्तावनेतून)