Harit Yuddha By Bahar Dutt
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
per
एका पर्यावरण पत्रकार स्त्रीने केलेलं अनुभवकथन म्हणजे ‘ग्रीन वॉर्स.’ पर्यावरण रक्षणाच्या विविध मोहिमांदरम्यान आलेले हे अनुभव आहेत. त्या अनुभवांचं हे तपशीलवार चित्रण आहे. गारुड्यांचं पुनर्वसन, सारस पक्ष्यांना वाचविण्याची मोहीम, सुसरींच्या कमी होणाNया संख्येबाबत अभ्यास, मेघालयातील जंगलतोड थांबविण्यासाठी केलेले प्रयत्न, हुलॉक वानरांसाठी चालवलेलं मुक्तिवेंÂद्र, ‘सरस्वती वन्यजीव अभयारण्य’ वाचविण्यासाठी उघडलेली मोहीम, गोव्यात खाणमाफियांना दिलेली टक्कर, इंडोनेशियातील जंगल आणि ओरंग उटान माकडाचं अस्तित्व जपण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न, हिमनद्या, ग्लोबल वॉर्मिंगसाठी अभ्यासदौरा इ. विविध प्रकारच्या पर्यावरण मोहिमा त्यांनी राबवल्या. तर पर्यावरणाच्या विविध अंगांचा बहार यांनी केलेला अभ्यास, पर्यावरणाच्या त्या त्या प्रश्नातील वंÂगोरे आणि आव्हानं, या समस्यांच्या संदर्भात त्यांना भेटलेली माणसं इत्यादी बाबींबद्दल बहार यांनी वाचकांशी साधलेला हा संवाद मुळातून वाचण्यासारखा आहे. पर्यावरणाच्या विविध बाजू, पर्यावरण आणि विकास या बाबतीत होणारा संघर्ष, पर्यावरणाकडे सत्ताधाNयांचं असलेलं दुर्लक्ष, पर्यावरणाच्या क्षेत्रात शिरलेलं राजकारण, पर्यावरणाच्या Nहासामुळे झालेलं आणि होऊ घातलेलं नुकसान या सगळ्या गोष्टी सामान्य माणसालाही हे पुस्तक वाचून कळतील आणि लोकांमध्ये पर्यावरणाच्या बाबतीत थोडी तरी जागरूकता येईल. तेव्हा पर्यावरणप्रेमींसह सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावं.