Har Ek Pal Ka Shayar Sahir Ludhiyanvi हर इक पल का शायर : साहिर लुधियानवी लक्ष्मीकांत देशमुख by Laxmikant Deshmukh
Har Ek Pal Ka Shayar Sahir Ludhiyanvi हर इक पल का शायर : साहिर लुधियानवी लक्ष्मीकांत देशमुख by Laxmikant Deshmukh
साहिर लुधियानवी ( ८ मार्च १९२१- २५ ऑक्टोबर १९८० ) हा असा एक गीतकार होऊन गेलेला आहे की ज्याची गाणी अजून आपल्याला झपाटून टाकतात, तंद्री निर्माण करतात, एक भावावस्था उत्पन्न करतात. गाणी ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर आपल्या मनात ती निनादात राहतात. लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेले ‘हर इक पल का शायर’ हे याच गीतकाराचे चरित्र आहे. या ग्रंथात त्यांनी साहिर लुधियानवी यांचे जीवन आणि त्यांची शायरी उलगडून दाखवलेली आहे. साहिरच्या जगण्यातूनच त्याची शायरी कशी सहजपणे उदयाला आली याचे मार्मिक विवेचन त्यांनी केलेले आहे. लक्ष्मीकांत देशमुख यांनी साहिरचे जीवनचरित्र आणि त्याची शायरी यांचे सखोल अध्ययन केले आहे, त्याचे चरित्रकथन करताना विविध संदर्भांची जोड दिली आहे. आणि शायरीचे मर्म विशद करताना विलक्षण संवेदनशीलता व्यक्त केली आहे. त्यामुळे हे चरित्रकथन अत्यंत वाचनीय झाले आहे. ठिकठिकाणी साहिरच्या शायरीतील उद्धरणे दिलेली आहेत, ती वाचताना आपल्या मनात ती गाणी वाजू लागतात आणि अर्थाची वलये उमटू लागतात. हे चरित्र वाचून झाल्यानंतरही मनात ती गाणी रुणझुणत राहतात. ‘हर इक पल का शायर : साहिर लुधियानवी : जीवन आणि शायरी ‘ हा एक अतिशय महत्त्वाचा असा चरित्रग्रंथ आहे. ते कविचरीत्र आहे, काव्यचरित्र आहे, ते समाजचरित्रही आहे.
– वसंत आबाजी डहाके