Payal Books
Gunakari Aahar By Dr. Hari Krishna Bakhru, Arun Mande
Regular price
Rs. 100.00
Regular price
Sale price
Rs. 100.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
फळे, भाज्या, कडधान्ये, तृणधान्ये, सुकामेवा व इतर अन्नपदार्थात अनेक औषधी गुणधर्म दडलेले असतात. परंतु एखाद्या जादूसारखे परिणाम करणारे त्यातील जे सुप्त गुण ते आपल्याला कुठे माहीत असतात? सुप्रसिध्द निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. हरी कृष्ण बाखरू यांनी सखोल अभ्यास करून ही माहिती तपशीलवार व सामान्यजनांना सहज उपयोगी पडेल अशा पध्दतीने या पुस्तकात दिली आहे. प्रत्येक अन्नपदार्थाची सर्वसाधारण शास्त्रीय माहिती, त्यातील अन्नमूल्ये, त्याचे औषधी गुणधर्म आणि मुख्यत: हे अन्नपदार्थ कोणकोणत्या आजारावर उपयुक्त आहेत व त्यासाठी त्यांचा वापर कसा करावा; या सर्वांबाबतची परिपूर्ण माहिती या पुस्तकात आहे. उत्तम आरोग्यासाठीच्या या नैसर्गिक मार्गाची काही उदाहरणे पहा - संधिवातावर : केळे, काकडी, लसूण, टोमॅटो, उडीद दम्यावर : बेलफळ, अंजीर, द्राक्ष, आवळा, संत्र, दुधी भोपळा, शेवग्याच्या शेंगा, लसूण, आले, पुदिना, नारळ, करडईच्या बिया, मध मधुमेहावर : पपनस, आवळा, जांभूळ, आंब्याची पाने, कार्ले, मेथी, लेटयूस, सोयाबीन, टॉमेटो, हरभरे, भुईमूग पित्तावर : पपनस, बटाटे, भात, खोबरे, मध, ऊस उच्च रक्तदाबावर : भात, लसूण, लिंबू, सफरचंद लठ्ठपणावर : लिंबू, कोबी, टोमॅटो, भुईमूग
