अमेरिकेचा सोळावा राष्ट्राध्यक्ष असलेल्या अब्राहम लिंकनचे आयुष्य विलक्षण आहे.
एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या लिंकनने अमेरिकेच्या उत्कर्षाचे मोठे स्वप्न पाहिले आणि ते वास्तवात पूर्णही केले. अमेरिका एकसंघ ठेवणे, लोकशाही मार्गाचा अवलंंब आणि नीग्रोंची गुलामगिरी कायद्याने नष्ट करणे ही त्याची अमेरिकेला मोठी देणगी आहे.
एका सामान्य गरीब कुटुंबातला लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने सार्या जगाचेच लक्ष वेधून घेतो, ही कथा फार विलक्षण आहे. त्याच्या आयुष्याचा हा प्रवास थक्क करणारा आहे.
आधुनिक अमेरिकेचा शिल्पकार असलेल्या लिंकनचे चरित्र वाचलेच पाहिजे. महापुरुषांच्या अशा चरित्रकथा प्रेरणादायी ठरतात. त्यांच्या जीवन-प्रकाशात आपणही उजळून निघतो.
Share
Choosing a selection results in a full page refresh.