{"product_id":"grampanchayat-karbhaar-ani-kaarbhari","title":"Grampanchayat : Karbhaar ani Kaarbhari","description":"\u003csection class=\"page-product-box\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_left\"\u003e\n\u003cp\u003eस्मार्ट ग्रामपंचायतीचं तंत्र आणि मंत्र\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e' ग्रामपंचायत : कारभार आणि कारभारी ' हे पुस्तक आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी मोलाची माहिती देणाऱ्या मित्राची भूमिका बजावतं. ग. शां. पंडित यांनी या पुस्तकाच्या लेखनामागची भूमिका स्पष्ट करताना मनोगतात लिहिलं आहे, ' गाव सुधारले तर देश सुधारेल , हा संत महंतांच्या विचारांचा गर्भितार्थ लक्षात घेऊन सध्याच्या शासनाने ' स्मार्ट सिटी'प्रमाणेच 'स्मार्ट व्हिलेज'ची संकल्पना पुढे आणली आहे. ' आमचा गाव, आमचा विकास' या योजनेच्या माध्यमातून निधीचा सुयोग्य वापर व्हावा व गावातील सर्वच घटकांना या विकासप्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठी ' ग्रामपंचायत विकास आराखडा ' तयार करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. त्यामुळे ग्रामीण, आदिवासी भागाच्या विकासाला पूरक वातावरण तयार होईल.' यात शासकीय अधिकाऱ्यांपासून गावातल्या स्वयंसेवक व युवक कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाला काय करावं लागेल, हे ' ग्रामपंचायत कारभार व कारभारी' या पुस्तकात अतिशय सोपं करून लिहिलेलं आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"SAKAL PRAKASHAN","offer_id":42620182954177,"sku":"","price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/4269-thickbox_default.jpg?v=1684134828","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/grampanchayat-karbhaar-ani-kaarbhari","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}