Payal Books
Grampanchayat : Karbhaar ani Kaarbhari
Couldn't load pickup availability
स्मार्ट ग्रामपंचायतीचं तंत्र आणि मंत्र
' ग्रामपंचायत : कारभार आणि कारभारी ' हे पुस्तक आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी मोलाची माहिती देणाऱ्या मित्राची भूमिका बजावतं. ग. शां. पंडित यांनी या पुस्तकाच्या लेखनामागची भूमिका स्पष्ट करताना मनोगतात लिहिलं आहे, ' गाव सुधारले तर देश सुधारेल , हा संत महंतांच्या विचारांचा गर्भितार्थ लक्षात घेऊन सध्याच्या शासनाने ' स्मार्ट सिटी'प्रमाणेच 'स्मार्ट व्हिलेज'ची संकल्पना पुढे आणली आहे. ' आमचा गाव, आमचा विकास' या योजनेच्या माध्यमातून निधीचा सुयोग्य वापर व्हावा व गावातील सर्वच घटकांना या विकासप्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठी ' ग्रामपंचायत विकास आराखडा ' तयार करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. त्यामुळे ग्रामीण, आदिवासी भागाच्या विकासाला पूरक वातावरण तयार होईल.' यात शासकीय अधिकाऱ्यांपासून गावातल्या स्वयंसेवक व युवक कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाला काय करावं लागेल, हे ' ग्रामपंचायत कारभार व कारभारी' या पुस्तकात अतिशय सोपं करून लिहिलेलं आहे.

