Payal Books
Gotra By Ravindra Shobhane
Couldn't load pickup availability
आपल्या जगण्याच्या प्रवासात काही माणसे नकळतपणे येतात आणि आपल्या भावविश्वाचे कोपरे व्यापून घेतात. यातले काही दूरपर्यंत सोबत करतात, तर काही मध्येच थबकतात. त्यांच्या असण्या-नसण्याची सवय आपल्याला झालेली असते. त्यांच्या असण्याने आपण समृद्ध होत जातो, तर नसण्याने पोरकेपणाची भावना आत खोलवर कायमची ठणकत असते. कशी असतात ही माणसे? उत्तुंग म्हणून मिरवण्यापासून सामान्य म्हणून स्वीकारण्या-नाकारण्यापर्यंतची? अशी माणसे आपल्याला पुरती कळली या समजात आपण वावरत असतो; पण प्रत्यक्षात ती किती कळलेली असतात? का ती अशी समजून घेताना आकलनाआधीच आपल्या परिघातून निसटून जातात? आपल्या आयुष्यात आलेल्या आणि उभं-आडवं आयुष्यच व्यापून उरलेल्या या माणसांविषयीचा हा एक मनोज्ञ प्रवास. निरंतर चालणारा आणि तरीही चकवे निर्माण करणारा… गोत्र
