Payal Books
Goshta Reserve Bankechi by Vidhyadhar Anaskar गोष्ट रिझर्व्ह बँकेची विद्याधर अनास्कर
Couldn't load pickup availability
Goshta Reserve Bankechi by Vidhyadhar Anaskar गोष्ट रिझर्व्ह बँकेची विद्याधर अनास्कर
शेतकर्यांपासून कामगारांपर्यंत, उद्योगपतींपासून गृहिणीपर्यंत, अगदी नोकरदारापासून संतमहंतांपर्यंत प्रत्येकाचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष बँकेशी संबंध येतोच. जशी व्यक्तीची अथवा संस्थेची कुठली ना कुठली बँक, तशी बँकांची बँक, सार्या देशाची बँक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक. कधी स्थापन झाली ही बँक ? कसा झाला या बँकेचा आजवरचा प्रवास ? स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात काय होती या बँकेची भूमिका अन् कार्यपद्धती ? देशातील सरकार, प्रशासन, अर्थव्यवस्था अन् सामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यापासून दीर्घकालीन परिणामांपर्यंत अनेक घटकांवर परिणाम करणार्या धोरणांची आखणी करणारी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक. भारतासारख्या खंडप्राय विशाल देशाच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण सहभाग असणार्या रिझर्व्ह बँकेचा रोचक इतिहास अत्यंत रंजक पद्धतीने सांगत आहेत सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ विद्याधर अनास्कर.
गोष्ट रिझर्व्ह बँकेची
