Payal Books
Goshta Choti Dongaraevadhi by Arvind jagtap गोष्ट छोटी डोंगराएवढी अरविंद जगताप
Regular price
Rs. 220.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 220.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
गोष्ट छोटी डोंगराएवढी' हे पुस्तक नुकतंच नव्या रूपात प्रकाशित झालं आहे. छ. संभाजीनगरच्या आदित्य प्रकाशनाने अत्यंत सुबक अशा स्वरूपात या पुस्तकाला आकार दिला आहे. या पुस्तकात अनेक व्यक्तिरेखांच्या माध्यमातून जगताप यांनी संवाद साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. माणसांचे स्वभाव, त्यांच्यात अंगभूत असलेले कारनामे, वाईट चांगल्या सवयी, त्यामुळे त्यांच्या जवळ राहणाऱ्या व्यक्तींना होणारा त्रास या सगळ्यांचं थोडक्यात; पण मनाच्या तळाशी जाऊन ढवळून काढणारं वर्णन आणि कधी कधी खळखळून हसवून टेन्शनुक्त करणाऱ्या बाबी त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींमधून वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. चौतीसएक गोष्टींमधून हा संवाद त्यांनी प्रांजळपणे साधला आहे. अनेक गोष्टीतून माणूस अंतर्मुख होतो, तसा तो मनमुक्त हसतोही. त्यातली सलमा पे दिल आ गया, पाकिस्तानचं यान, स्मार्ट फोन आदी गोष्टी आपल्याला माणसाच्या मनाच्या अनेक रंजक कंगोऱ्यांची भेट घडवून आणतात, हसवतात, चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांना व्यायाम देऊन तरुण करतात, आणि भोवतालच्या माणसांच्या अंतरंगात डोकवायला भाग पाडतात यात शंका नाही.
