{"product_id":"gods-guns-and-missionaries-by-manu-s-pillai-savita-damale-गॉड्स-गन्स-अ‍ॅण्ड-मिशनरीज-मनू-एस-पिल्लई","title":"Gods Guns And Missionaries By Manu S Pillai Savita Damale गॉड्स, गन्स अ‍ॅण्ड मिशनरीज  मनू एस. पिल्लई","description":"\u003cp\u003eGods Guns And Missionaries By Manu S Pillai Savita Damale गॉड्स, गन्स अॅण्ड मिशनरीज  मनू एस. पिल्लई\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eयुरोपीय मिशनरी सोळाव्या शतकात भारतात पहिल्यांदा आले, तेव्हा त्यांनी ज्या जगात प्रवेश केला ते मोहमयी आणि गोंधळात टाकणारं होतं. हिंदू धर्म म्हणजे ‘भक्ती व उपासनांचा सावळागोंधळ’ अशी त्यांची धारणा झाली. कारण सैतानं आणि राक्षसं यांची पूजा करणारे, स्त्रियांना जिवंत जाळणारे, अतिशय विचित्र विधी करणारे आणि लहान मुलांना मगरींच्या तोंडी देणारे लोक अशा स्वरूपात त्यांनी हिंदू धर्माकडे पाहिलं होतं. परंतु थोड्याच काळात हे स्पष्ट झालं, की गौरवर्णी माणसांच्या साचेबद्ध कल्पनेहून हिंदूंची ‘विभूतीपूजा’ अधिक गुंतागुंतीची आहे. आणि हिंदूंना धर्मांतर करण्याची मुळीच इच्छा नाही. तोवर युरोपीय सत्ता भारतात वाढू लागली होती आणि ब्रिटिश साम्राज्यवादी सत्तेखाली मिशनऱ्यांनी एक उग्र स्वरूप धारण केलं होतं. ब्रिटिश राजवटीत पाश्चात्त्य विचार चौकटींचं प्रभुत्व वाढलं. त्यामुळे आपल्या धर्माची पुनर्कल्पना करण्याचा दबाव हिंदूंवर आला. ख्रिश्चन हल्ल्यांचा प्रतिकार करण्याइतपत आपला धर्म बळकट करणं आणि परदेशी सत्तेचा प्रतिकार करणं असा दुहेरी स्वरूपाचा हा दबाव होता.मिशनऱ्यांशी आलेल्या या संबंधांतून आधुनिक हिंदू धर्माला सध्याचं रूप धारण करण्याची प्रेरणा मिळाली. किंबहुना, या प्रक्रियेत हिंदूंनी मिशनऱ्यांची काही साधनं आणि धोरणं स्वतःच्या सोयीने वापरली, आणि त्यातूनच हिंदू राष्ट्रवादाचा जन्म झाला. सध्या आपल्या देशात त्याच हिंदू राष्ट्रवादाचं वर्चस्व आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकाच्या माध्यमातून मनू पिल्लई आपल्याला या लक्षवेधी घडामोडींच्या प्रवासास नेतात. राजे-महाराजे, कवी, बंदुकधारी क्रांतिकारक, राजकारणी, वादविवादपटू, तत्त्ववेत्ते आणि पाद्री-पुरोहित अशा अत्यंत लक्षवेधी व्यक्तिरेखांनी भरलेल्या या पुस्तकाचा आवाका महत्त्वाकांक्षी असून त्याची भूमिका अतिशय धारदार व अपारंपरिक आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"MADHUSHREE PUBLICATIONS","offer_id":50412414959809,"sku":null,"price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Gods_Guns_And_Missionaries_By_Manu_S_Pillai_Savita_Damale_..webp?v=1784198185","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/gods-guns-and-missionaries-by-manu-s-pillai-savita-damale-%e0%a4%97%e0%a5%89%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%97%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%85%e2%80%8d%e0%a5%85%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9c-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%82-%e0%a4%8f%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%88","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}