Godatatiche Kailaslene गोदातटीचे कैलासलेणे By Narahar kurundakar
गोदातटीचे कैलासलेणे
नरहर कुरुंदकर स्मृतिग्रंथ
नरहर कुरुंदकर यांचे राजकीय चिंतन, पौर्वात्य तत्त्वज्ञानाविषयीचे त्यांचे विचार, इहलोकवादाविषयीचे त्यांचे विश्लेषण, कुरुंदकर यांची दलित साहित्यविषयक भूमिका, नाटय़शास्त्र व संगीतविषयक चिंतन इत्यादी गोष्टींचा समावेश विशेषांकात आहे. कवी मर्ढेकर यांच्याविषयीचे लेखन, १८ व्या शतकातील भारत असे कुरुंदकर यांचे अप्रकाशित साहित्य या विशेषांकात उपलब्ध आहे. गीता रहस्य या विषयावरील कुरुंदकर यांचे आकाशवाणीवरील भाषण, ‘मी आस्तिक का नाही ?’ या विषयावरील नांदेड येथील व्याख्यान या गोष्टीही विशेषांकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. प्राचार्य आणि साहित्य समीक्षक या दृष्टिकोनातून कुरुंदकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्यात आला आहे. त्यांचा जीवनपटही या विशेषांकात उलगडण्यात आला आहे. विशेषांकाच्या शेवटी त्यांच्या प्रकाशित लेखांची सूची देण्यात आली आहे