Skip to product information
1 of 1

Payal Books

Goals! | गोल्स! by AUTHOR :- Brian Tracy

Regular price Rs. 222.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 222.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

तुम्ही कल्पिले नसेल त्याहीपेक्षा वेगाने तुम्हाला हवे ते सर्व मिळवा
जिथे काही लोक अधिक चांगल्या आयुष्याची केवळ स्वप्नं बघण्यात घालवतात,
तिथे काहीजण आपले प्रत्येक ध्येय साध्य करण्यात कसे यशस्वी होतात?
प्रसिद्ध लेखक ब्रायन टेसी सांगतात की निराशेकडून स्वप्नपर्तीकडे जाणारा मार्ग शोधण्यात आला आहे.
हजारो, लाखो नव्हे तर अब्जावधी लोकांनी शून्यातून सुरुवात करून भरघोस यश मिळवले आहे.
आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी लागणाऱ्या काही अत्यावश्यक तत्त्वांबद्दल ब्रायन ट्रेसी आपल्याला सांगतातः
ब्रायन ट्रेसी आपल्याला ध्येय ठरवण्यासाठी आणि साध्य करण्यासाठी एक साधी, सशक्त आणि उपयुक्त पद्धत सांगतात.
अद्वितीय परिणामांसाठी ही पद्धत एक दशलक्षांहून जास्त लोकांनी अवलंबली आहे.
ट्रेसी म्हणतात या पुस्तकात दिलेल्या एकवीस पद्धतींचा वापर करून तुम्ही मोठ्यात मोठे ध्येय प्राप्त करू शकाल.
आपली वैयक्तिक क्षमता कशी ठरवावी, आयुष्यात काय खरोखरच महत्त्वाचे आहे, हे कसे ठरवावे आणि येत्या काही वर्षांत तुम्हाला जे साध्य करायचे आहे त्यावर लक्ष केंद्रित कसे करावे हे या पुस्तकामुळे तुम्हाला शिकायला मिळेल.

आत्मविश्वास कसा वाढवावा, आपल्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा वा अडचण कशी दूर करावी, संकटातून मार्ग कसा काढावा, आव्हानांना प्रतिसाद कसा द्यावा आणि काहीही झाले तरी आपले ध्येय कसे साध्य करावे हे ट्रेसी तुम्हाला शिकवतील.
सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे तुमच्या उर्वरित आयुष्यात वापरता येण्याजोगी एक अनुभवसिद्ध कार्यप्रणाली तुम्ही आत्मसात कराल.

ब्रायन ट्रेसी हे जगभरातील अत्युत्तम दर्जाचे व्यवस्थापन, सल्लागार, प्रशिक्षक आणि वक्ते आहेत. या पुस्तकात नेमकेपणाने दिलेली पद्धत वापरून ते रंकाचे राजा बनले. जगभरात दरवर्षी ते २५०,००० लोकांशी वक्ते म्हणून संवाद साधतात; तर प्रशिक्षक आणि सल्लागार म्हणून त्यांनी १००० संस्थांसाठी काम केले आहे. यात आयबीएम, फोर्ड, मॅकडॉनल उग्लास, झेरॉक्स, हॅवलेट पॅकार्ड, यूएस बँकॉर्प, नॉर्थवेस्टर्न म्युचल, फेडरल एक्सप्रेस आणि इतर अनेक संस्थांचा समावेश आहे. त्यांनी ३५ पुस्तके लिहिली आहेत, तर ३०० पेक्षा अधिक दृकश्राव्य कार्यक्रमांची निर्मिती केली आहे.