GO KISS THE WORLD by SUBROTO BAGCHI
GO KISS THE WORLD by SUBROTO BAGCHI
असे प्रेरणादायी अनुभव वाचणं हा कोणत्याही वयोगटाच्या वाचकाला अत्यंत श्रीमंत करणारा अनुभव ठरतो. ‘माइन्ड-ट्री’ या भारतातल्या अत्यंत नामवंत अशा सॉफ्टवेअर सव्र्हिसेस कंपनीचे सहसंस्थापक सुब्रतो बागची म्हणतात, ‘‘देशातील लाखो व्यावसायिकांना आणि लहान लहान गावातील तरुणांना संदेश देणं की, माझ्याप्रमाणेच तेसुद्धा आयुष्यात यशस्वी होऊ शकतील, हा हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू आहे.’’ व्यावसायिक आयुष्याचा प्रारंभ असतो जीवनातला अत्यंत निर्णायक टप्पा! या टप्प्यावर बुजुर्ग व्यक्तीनं स्वानुभवाद्वारे, तरुणाईला हसत-खेळत केलेलं मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरतं. ‘गो, किस द वर्ल्ड’ (जा, सारी दुनिया कवेत घे!) हा ‘माइन्ड-ट्री’ या सॉफ्टवेअर कंपनीचे सहसंस्थापक श्री. सुब्रतो बागचींच्या मृत्युशय्येवरच्या अंध मातु:श्रींनी त्यांना दिलेला संदेश, हेच प्रेरणादायी पुस्तकाचं शीर्षक आहे. चला तर मग! पाहू या की, श्री. बागचींनी आपली आंतरिक शक्ती ओळखून ती विकसित करताना कोणती आव्हानं पेलली आणि नव्या अनुभवांसाठी मनाची कवाडं उघडी ठेवून कोणता बोध घेतला!!