इतर सगळ्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल नेमकं ठरवता आलं आहे आणि तुम्हाला मात्र त्याचा थांगपत्ताही लागत नाही असा संशय तुम्हाला कधी आला आहे का? असं जर तुम्हाला वाटत असेल तर रेचल हॉलिस यांना काहीतरी सांगायचं आहे. त्या म्हणतात: ही चुकीची समजूत आहे. रेचल हॉलिस या लाइफस्टाइलविषयक वेबसाइटच्या म्हणजे द चिकसाइट डॉट कॉमच्या (ढहशउहळलडळींश.लेा) संस्थापक आणि स्वतःच्या मालकीच्या मीडिया कंपनीच्या सीइओ आहेत.
त्यांनी प्रचंड विस्तार असलेला एक ऑनलाइन समुदाय (कम्युनिटी) विकसित केला आहे. यावर त्या चांगलं आयुष्य कसं जगायचं यासंबंधीच्या युक्तीच्या चार गोष्टी तर सांगतातच; पण त्याचवेळी स्वतःच्या आयुष्यातील गोंधळाबाबतही त्या निर्भीडपणे लिहितात. या नव्या आव्हानात्मक आणि प्रेरणादायी पुस्तकात रेचल यांनी जीवनविषयक वीस चुकीच्या समजुतींवर प्रकाशझोत टाकला आहे. या चुकीच्या समजुती आपल्याला आनंदी, उत्पादक आयुष्य जगण्यापासून मागे खेचतात.
या चुकीच्या समजुती आपण स्वत:लाच इतक्या वेळा सांगितलेल्या असतात की, पुढे पुढे तर आपल्याला तेच सत्य आहे असं वाटायला लागतं. प्रस्तुत पुस्तकात रेचल हॉलिस वेदनादायक प्रामाणिकपणा आणि निर्भीड विनोदाच्या साहाय्याने त्यांच्या आयुष्यातील चुकीच्या समजुतींविषयी विस्ताराने चर्चा करतात. त्यांची तपासणी करतात आणि या समजुतींनी त्यांना कसं भावविवश केलं होतं, अयोग्य ठरवलं होतं, याचीही उदाहरणं देतात.
पण याच्यावर मात करण्यासाठी त्यांना विशिष्ट असे कोणते व्यावहारिक धोरण उपयुक्त ठरले, हेही त्या उघड करून दाखवतात. या सगळ्या प्रक्रियेत त्या प्रोत्साहन देतात, मनोरंजन करतात आणि कधी कधी थोडी फार थट्टा-मस्करीही करतात. खरोखरच आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण स्त्री होण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करणं आवश्यक आहे, ते तुम्ही केले पाहिजेत याची खात्री पटवण्यासाठी, हा सगळा लिखाणाचा घाट त्यांनी घातला आहे.
दृढ विश्वास, कणखरपणा आणि चिकाटी या गुणांबरोबरच प्रस्तुत पुस्तक आयुष्य हे प्रेम, उत्कटता, कठोर परिश्रम करून आणि कृतिशील राहून कसे जगायचे हे दाखवून देते. कोणतीही गोष्ट सोडून न देता ती प्रयत्नपूर्वक करत राहणे आणि यात तुम्ही स्वतःचा डौलदारपणा कसा जपायला हवा, हेही हे पुस्तक सांगते.
Girl, Wash Your Face | गर्ल, वॉश युअर फेस by AUTHOR :- Rachel Hollis
Regular price
Rs. 313.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 313.00
Unit price
per