Gibberish Katha by Sujay Jadhav
Gibberish Katha by Sujay Jadhav
जिब्रिश (Gibberish) म्हणजे बाष्कळ, ज्याचा अर्थ लागणार नाही, असं काहीसं. ओळखीच्या जगाचा संदर्भ सोडून नवनवे अपरिचित प्रदेश धुंडाळणाऱ्या या कथांच्या प्रवृत्तीसाठी हे सूचक नाव आहे...
कथांचं लॉजिक हे वास्तवाशी फारकत घेणारं, मुक्त रचनेला कवटाळणारं, आणि संकल्पनेच्या पातळीवर कथेच्या मांडणीशी खेळणारं आहे... सायन्स फिक्शन, फॅन्टसी, मॅजिक रिअलिझम, भाषिक चमत्कृतीशी खेळणाऱ्या कथा, विडंबन, अशा अनेक प्रकारांमधे 'जिब्रिश कथा' लीलया वावरत असतात...
या लहानशा कथासंग्रहातही सुजयची लेखक म्हणून रेंज लक्षात येते. वाचणाऱ्यांनाही ती नक्कीच त्यांच्या ओळखीच्या प्रदेशापलीकडल्या नव्या जागा दाखवेल.