PAYAL BOOKS
Gaza Israel Sangharsh By Nilu Damale गाझा-इस्त्रायल संघर्ष निळू दामले
Couldn't load pickup availability
Gaza Israel Sangharsh By Nilu Damale गाझा-इस्त्रायल संघर्ष निळू दामले
गाझा-इस्त्रायल संघर्ष अन्याय सूड तडफड एक अविरत चक्र लेखक : निळू दामले
इस्त्रायल कधी नव्हे तो बेसावध राहिला… आणि ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने त्याच्यावर जोरदार आणि चौफेर हल्ला केला.
त्या हल्ल्याचा प्रतिशोध घेता-घेता इस्त्रायलने गाझावर बेबंदपणे अविरत बॉम्ब हल्ले केले. घरं, दारं, माणसं, शिक्षण संस्था, हॉस्पिटल्स, रीलीफ कॅम्प्स, अॅम्ब्युलन्स काहीच सोडलं नाही. गाझा जवळपास उद्ध्वस्त झालं…
हा झाला वर्तमान. पण पॅलेस्टाइनचा या वादग्रस्त तिढ्याला इतिहास आहे तो अनेक शतकांपासूनचा.
विशेषतः १९४८ साली इस्रायलची स्थापना झाली आणि या वादग्रस्त समस्येच्या कक्षा अनेक पटींनी रुंदावल्या.
पॅलेस्टाइनचं म्हणणं असं की, ही भूमी आमची…. तर, इस्त्रायल स्वप्न पाहतो आहे, ते संपूर्ण पॅलेस्टाइन भूमी काबीज करण्याचं.
इतिहास काय सांगतो? वास्तव स्थिती काय सांगते?
सुप्रसिद्ध पत्रकार-लेखक निळू दामले मुळात जाऊन या प्रकरणाचा उलगडा करतात.
आणि सद्य घटनांचे तपशीलही सांगतात.
अतिशय गुंतागुंतीचा तिढा सहज, सोप्या शैलीत सांगणारं पुस्तक..

