Gavmohar | गावमोहर Author: Arun Jakhade|अरुण जाखडे
‘गावमोहर’ ही एक निसर्ग कादंबरी आहे.
ग्रामीण जीवन आणि सौंदर्य त्यात हळूवारपणे उलगडत जाते.
निष्पाप आणि निरागस अशी शहरातील पाच मुले आणि खेडेगावातील एक मुलगा अशा सहा खेळकर मुलांभोवती फुललेल्या ह्या कादंबरीत मुलांचे भावविश्व, निसर्गाशी एकरूप होण्याची
त्यांची तन्मयता आणि नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याची आणि त्यांचा आनंद उपभोगण्याची वृत्ती ह्याचे चित्रण लेखकाने
कादंबरीत केले आहे.
ज्यांना ग्रामीण जीवन आणि निसर्ग ह्याविषयी कुतुहूल आहे,
त्यांनी ही कादंबरी अवश्य वाचावी.
महाराष्ट्र राज्य शासन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ह्यांचे 1995 ह्या वर्षातील उत्कृष्ट वाङ्मयासाठीचे पुरस्कार ‘गावमोहर’ला प्राप्त झाले आहेत.