Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Gaon Tithe Mansopchar (गाव तिथे मानसोपचार) by The Indian Psychiatric Society (IPS) West Zone

Regular price Rs. 220.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 220.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Gaon Tithe Mansopchar (गाव तिथे मानसोपचार) by The Indian Psychiatric Society (IPS) West Zone

मानसिक आरोग्य हे आपल्या साऱ्यांच्याच व्यक्तिमत्त्वाचं एक महत्त्वाचं अंग असतं. किंबहुना, आपलं मानसिक आरोग्य कसं आहे यातूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार येतो, असं म्हणणंही वावगं ठरणार नाही. मात्र तरीही मानसिक आरोग्य हा एक दुर्लक्षित आणि 'कलंकित' मुद्दा आहे, ही वस्तुस्थिती आहे. ग्रामीण भागात मानसिक आजारांविषयीच्या माहितीचा अभाव असतो, संसाधनांचा अभाव असतो. किंबहुना म्हणूनच त्यावर अंधश्रद्धांमधून सोपी उत्तरं शोधली जातात आणि मग मानसिक समस्या, मानसिक संघर्ष अटळ होऊन जातात. अशा परिस्थितीत हे पुस्तक निश्चितच एक आशेचा किरण ठरावं. ग्रामीण भागात बऱ्याचदा मानसिक आरोग्याच्या आव्हानांकडे दुर्लक्ष केलं जातं. या आव्हानांवर हे पुस्तक प्रकाश टाकेल. या आव्हानांवर ते 'रेडीमेड' उत्तर ठरणार नाही, मात्र मानसिक समस्यांना तोंड देण्यासाठी ते बळ देईल, या समस्यांचं निराकरण करण्यासाठी गावोगावी, गल्लोगल्ली जनजागृती होणं आवश्यक आहे यावर जोर देईल आणि अशा कार्यक्रमांमधून, उपक्रमां- मधून गरजूंना त्वरित मदत होऊ शकते, असा विश्वास देईल.