Gandhinnantarcha Bharat Jagatil Sarvat Mothya Lokshahicha Itihas by Ramchandra Guha गांधींनंतरचा भारत जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा इतिहास
Gandhinnantarcha Bharat Jagatil Sarvat Mothya Lokshahicha Itihas by Ramchandra Guha गांधींनंतरचा भारत जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा इतिहास
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा इतिहास. असंख्य जाती-जमाती, वर्ग, भाषा आणि धर्म यात विभागलेला, प्रचंड हलाखीच्या परिस्थितीत जीव व्यतीत करणारा आणि यादवी संघषार्थ बुडालेला हिंदुस्थान स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एक एकात्म लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयाला येईल आणि टिकून राहील असे कोणालाही वाटले नव्हते. या वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथात भारताच्या निर्माणाची करुण तसेच संघर्षमय कहाणी त्यातील सर्व गर्हणीय तसेच उदात्त इतिहास क्षणांचा वेध घेत रामचंद्र गुहांनी सांगितली आहे. आधुनिक भारताच्या जडण-घडणीची कथा जितकी उद्विग्न करणारी आहे तितकीच रसपूर्णही आहे.
भारतात वेळोवेळी झालेल्या निरनिराळ्या संघर्षांचे वर्णन रामचंद्र गुहांनी अतिशय ओघवत्या भाषेत केले आहे. त्यातून स्वतंत्र भारताच्या घडणीचा अद्यावत व अर्वाचीन पट आपल्या डोळ्यासमोर नाट्यमय रीतीने उलगडत जातो. असंख्य संघर्षांतूनही भारताला लोकशाहीच्या मार्गाने चालविणार्या प्रक्रियांचा त्यांनी सखोल ऊहापोह केला आहे. भारताचा आधुनिक इतिहास घडविणार्या अगणित व्यक्तिरेखा आहेत. प्रदीर्घ काळ पंतप्रधानपद भूषविणारे पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी आहेत. शेख अब्दुल्लांसारखे बंडखोर-राज्यकर्ते आहेत. एम.जी. रामचंद्रन, अंगामी झापू फिझो यासारखे प्रादेशिक नेते आहेत. जयप्रकाश नारायणसारखे सामाजिक कार्यकर्ते आहेत. रामचंद्र गुहा तितक्याच संवेदनशीलतेने सामान्य भारतीय स्त्री-पुरुषांबद्दल लिहितात.
रामचंद्र गुहांनी त्यासाठी अथक संशोधन करून नवनिर्मित भारत आपल्यासमोर उभा केला आहे