Gan Gungan By Satyashil Deshpande
एखादा राग किंवा एकच बंदिश आपल्या देशात वेगवेगळ्या तर्हेनं गायली गेली आहे. `मिले सूर मेरा तुम्हारा... कारण आपलं गाणं मिळतं-जुळतं, कारण आपण सगळे सारखे –' असल्या भ्रामक अन् सपक राष्ट्रीय एकात्मतेपेक्षा आपल्या रागसंगीतातील आर्काईव्ह साकार करणारी राष्ट्रीय व्यामिश्रता फार अस्सल अन् आकर्षक आहे. तीच आहे आपल्या संगीताच्या ठेव्याची श्रीमंती! या श्रीमंतीची नवी उमज आणि गाण्याची नवी समज करून देत आहेत सत्यशील देशपांडे. संगीतातील घराणी अन् त्यांची वैशिष्ट्यं, दिग्गज कलावंतांचे खुमासदार किस्से, रागसंगीताबद्दलचा वेगळा अनवट नजरिया अशा विविध गोष्टींनी नटलेलं हे पुस्तक केवळ वाचण्याचं नाही, तर ऐकण्याचंही आहे. पुस्तकात दिलेले QR कोड स्कॅन करून वाचक विविधरंगी मैफिलींचा सुश्राव्य आस्वाद घेऊ शकतात. समीक्षकांपासून रसिकांपर्यंत, ‘पेन'सेनांपासून ‘कान'सेनांपर्यंत सार्यांना सहप्रवासी बनवणारी एक सांगीतिक यात्रा !