Payal Books
Gadhivarchya Aaisaheb by Prof. Dr. Yashwant Patil प्रा. डॉ. यशवंत पाटील
Regular price
Rs. 150.00
Regular price
Rs. 170.00
Sale price
Rs. 150.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
प्रा. डॉ. यशवंत पाटील यांची ‘गढीवरच्या आईसाहेब’ ही कादंबरी अतिशय प्रत्ययकारी असून त्यात दोन संस्कृतींची आंतरवर्तुळे एकमेकांत कशी गुंफली आहेत हे सांगितले आहे. एकीकडे गढीवरचे मराठी खानदान आणि दुसरीकडे सुसंस्कृत असे ब्राम्हण कुटुंब यांचे चित्रण लेखकाने अतिशय ताकदीने मांडले आहे. ब्राम्हण कुटुंबातील केतकी आणि श्रीमंतीत वाढलेला गढीचा वारसदार रणधीर यांच्या प्रेमाची ही आगळीवेगळी गोष्ट या कादंबरीत आहे. गढीवरच्या आईसाहेब या दोघांच्या प्रेमाला विरोध न करता त्यांना पाठिंबा देतात आणि आशीर्वाद देतात. या प्रेमकथेची गुंफण यशवंत पाटील यांनी अतिशय प्रभावीपणे केली असून त्यात कुठेही बटबटीतपणा जाणवत नाही हे त्यांच्या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. लेखकाची संयत शैली, उत्तम शब्दचातुर्य आणि व्यक्तिरेखांसोबत सावलीसारखे येणारे माधुर्य वाचकांना मोहीत केल्याशिवाय राहणार नाही.