Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

G A Chya Teen Katha Anubhuti Ani Asvad By Dr Sanjeev Kulkarni जीएंच्या तीस कथा अनुभूती आणि आस्वाद

Regular price Rs. 220.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 220.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

G A Chya Teen Katha Anubhuti Ani Asvad By Dr Sanjeev Kulkarni जीएंच्या तीस कथा अनुभूती आणि आस्वाद 

डॉ. संजीव कुलकर्णी लिखित 'जीएंच्या तीस कथा : अनुभूती आणि आस्वाद' या आगामी पुस्तकातून
'हास्यामध्ये पर्यवसित होणाऱ्या जीवनविषयक सुखात्म जाणिवेची प्रतीती देणारा धर्म म्हणजे विनोद’ अशी विनोदाची एक व्याख्या आहे. या व्याख्येच्या कसोटीवर जीएंची ही कथा कितपत उतरते हे ज्याने त्याने ठरवावे. पण जीएंच्या विनोदी लेखनाची जातकुळी वक्रोक्तीसदृश आहे. एरवी बव्हंशी शोकात्म लेखन करणार्या जीएंनी असे सुखात्म जाणीव देणारे मोजकेच लेखन केले आहे खरे, पण त्यातही त्यांना ते निखळ ‘विनोदी’ असे ठेवता आले नाही. यामुळे त्यांचा विनोद हा वैशिष्ट्यपूर्ण होतो, पण त्याला मर्यादाही पडतात. त्यांचे असे लेखन (ही) थोडेसे एकांगी होते. ‘विपरीत अलंकार, विकृत आचार, भाषा, वेध, अंगविक्षेप यांच्या दर्शनाने निर्माण होतो तो हास्यरस’ असे भरतमुनींनी म्हटले आहे, तर ‘औचित्यविसंगतीची वा असंबद्धतेची जाणीव हेच विनोदभावनेचे मूळ आहे’ असे वा. ल. कुलकर्णी म्हणतात.
ही औचित्यविसंगती जीएंच्या विनोदी लेखनात वारंवार आढळते.‘खूप ताणलेल्या अपेक्षेच्या पदरी अचानक भोपळा येतो, तेव्हा हास्यनिर्मिती होते’ असे इमॅन्युएल कांट म्हणतो. म्हणजेच अपेक्षाभंग.
या तत्वाचा वापर करूनही काही ठिकाणी जीएंनी आपला विनोद फुलवला आहे. तथापि या तंत्रांच्या पुढे जाऊन ‘भिंतीतून जाणरा माणूस’ ही एक निखळ मजेदार गोष्ट आहे. जीए लिहितात की ‘चित्र्यांनी एका गुजराथी माणसाच्या पोटात एक मार्मिक (!) खळी मारली व त्याला बाजूला केले व त्याचा पाय त्याच्याच बायकोच्या पायावर पडला. तेंव्हा त्या पुरंध्रीने असे सुसाट, अस्खलित व रंगदार गुजराथी त्याला ऐकवले की बिचारा हवामान खात्याचा अहवाल वाचून विषण्ण झालेल्या म्हातार्या बेडकासारखा चेहरा करून गप्प उभा राहिला’ तेंव्हा येणारे हसू हे कोणत्या कारणाने आले, त्यासाठी विनोदनिर्मितीची कोणती कारणमीमांसा लागू पडते आहे, कोणते तंत्र येथे कामी आले आहे हे विचार मागे पडतात. अगदी अभावाने आढळणार्या जीएंच्या, ज्याला इंग्रजीत ‘for the want of a better word’ म्हणतात तशा, ‘विनोदी’ लेखनाची ही मजा आहे.