payal books
Fyodar Mikhaylavichche Char Mrutyu Ani Ek Punarutthan By Zhoran Zhivkovich, Abhishek Dhangar फ्योदर मिखायलविचचे चार मृत्यू आणि एक पुनरुत्थान
Couldn't load pickup availability
Fyodar Mikhaylavichche Char Mrutyu Ani Ek Punarutthan By Zhoran Zhivkovich, Abhishek Dhangar फ्योदर मिखायलविचचे चार मृत्यू आणि एक पुनरुत्थान
'फ्योदर मिखायलविचचे चार मृत्यू आणि एक पुनरुत्थान' ह्या कादंबरीत धुक्यानं भरलेल्या उद्यानात दोन हुबेहूब दिसणाऱ्यांची अचानक होणारी भेट, आगगाडीच्या रेस्टॉरन्ट कारमध्ये विचित्रपणे झालेला एका प्रवाशाचा मृत्यू, एका मानसशास्त्रज्ञानं अतिशय असाधारण पेशंटशी केलेली गंमतीदार परंतु शोकात्म सल्लामसलत, तुर्की स्नानगृहात होणारा एका अदृश्य व्यक्तीचा आणि कफल्लक झालेल्या जुगाऱ्याचा संवाद अशा चार प्रकरणांमध्ये सामायिक असलेली गोष्ट म्हणजे त्यातलं अतिशय प्रतिभावान, प्रसिद्ध परंतु परिस्थितीनं गांजलेलं मुख्य पात्र. हे पात्र म्हणजे 'क्राईम अँड पनिशमेंट', 'द इडियट', 'डीमन्स' आणि 'द ब्रदर्स कारमाझफ' या कादंबऱ्यांचा लेखकः फ्योदर मिखायलविच दस्तईव्स्की. झिवकोविच नेहमीच्या वाटणाऱ्या घटनांमध्ये समांतर वास्तव उभं करतात. खुनी थरारनाट्य, कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे भविष्यवर्ती चमत्कार अशा आशयसूत्रांमधून दस्तईव्स्कीसारख्या थोर लेखकाचं मरण आणि पुनरुत्थान झिवकोविच अनोख्या विश्वात आणि अनोख्या रीतीनं उभं करतात.
-गणेश विसपुते
