FRENCH RAJYAKRANTI ANI BADSHAH NAPOLEON by DR. JAYSINGRAO PAWAR
फ्रेंच राज्यक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नेपोलियनचा झालेला उदय... फ्रान्सचा पहिला कॉन्सल ते फ्रान्सचा बादशहा असा झालेला त्याचा प्रवास...नेपोलियनने लढलेल्या लढाया, त्यात मिळालेले यश-अपयश यांचा तपशील...इंग्लंडची त्याने केलेली आर्थिक कोंडी त्याच्यावर कशी उलटली, स्पेनच्या युद्धात त्याच्या अतिआत्मविश्वासाला स्पॅनिश लोकांनी कसा सुरुंग लावला या बाबींचा उल्लेख...नेपोलियनचा अस्त कसा झाला आणि त्याची अखेर कशी झाली...आधुनिक फ्रान्सचा निर्माता म्हणून त्याने आर्थिक, धार्मिक, शिक्षण क्षेत्रात केलेल्या सुधारणा, त्याने तयार केलेली घटना, लोककल्याणाची केलेली कामं... नेपोलियनमधील थोर प्रशासक, महान सेनापती इ. विविध अंगांनी नेपालियनचा वेध घेऊन तो मुत्सद्दी म्हणून कसा कमी पडला याची चर्चा, त्याच्या अस्ताची कारणमीमांसा केली आहे. त्याच्या मृत्यूनंतरही फ्रान्समधील त्याच्या लोकप्रियतेचा उल्लेख केला आहे. फ्रेंच राज्यक्रांती आणि नेपोलियनचं चरित्र यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकणारं वाचनीय पुस्तक.