Payal Books
Fantastic Feluda – Soneri Killa By Satyajit Ray
Couldn't load pickup availability
का मौल्यवान हस्तलिखिताचा शोध घेत असताना फेलूदा व त्याच्या सोबत्यांना चमत्कारिक व भयंकर माणसं भेटतात आणि फेलूदाला एक रक्त गोठवणारं गूढ व गहन प्रकरण सोडवावं लागतं. हस्तलिखिताचे संग्राहक जी. जी. सेन, त्यांचा चिटणीस निशीथ, वन्यजीवन फोटोग्राफर बिलास मजुमदार व ज्योतिषी लक्ष्मण भट्टाचार्य यांच्यात एक थंड डोक्यानं काम करणारा गुन्हेगार असतो आणि उशीर होण्यापूर्वी त्याला थांबवायचं असतं. जगन्नाथ पुरीच्या सागर किनार्यावर समुद्राइतकीच गूढ, गहिरी व गुंतवून टाकणारी ही थरारक गोष्ट.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे अकरावे पुस्तक.
विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!
