Payal Books
Fantastic Feluda – Kedarnathchi Kimay By Satyajit Ray
Couldn't load pickup availability
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां'ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने 'रोहन प्रकाशन' पुन्हा एकदा घेऊन आलं आहे - याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या ३ कथा...
१. फेलूदाला हिरो मानणार्या आपल्या पुतणीला, रुनाला एकदा अंबर सेन सांगतात की, एकदा तरी मी फेलूदाला हरवून दाखवेनच! म्हणून ते एक नाटक रचून घरातल्यांनाही त्यात सामील करून घेतात, आणि 'गायब झालेले अंबर सेन' शोधताना फेलूदाला उलगडतं या नाटकात दडलेलं अनपेक्षित रहस्य!
२.शंकरप्रसाद चौधरींकडे मौल्यवान अशा 'जहांगीरच्या सुवर्णमुद्रा' असल्याचं रहस्य चौधरींच्या जवळच्या तीन व्यक्तींनाच माहीत असतं. त्यातली एक मुद्रा चोरीला जाते. कोण असेल चोर? कसं पकडेल फेलूदा या सुवर्णमुद्रा चोरणार्याला?
३. केदारनाथच्या पर्वतातल्या एका संन्याशाकडे असते एकच ऐहिक गोष्ट - त्यांना सन्मानाने दिलेलं मौल्यवान रत्नजडित पेंडन्ट! पण त्यावर अनेकांचा डोळा असतो... फेलूदाला या प्रकरणातून बाजूला काढण्यासाठी त्याच्यावर जीवघेणे हल्ले होतात; पण 'केदारनाथची किमया' घडते अन् फेलूदा चातुर्याने या प्रकरणाचा छडा लावतो...!
