Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Engineerchi Gosht By Vishal Avachite इंजिनिअरची गोष्ट विशाल अवचिते

Regular price Rs. 340.00
Regular price Rs. 380.00 Sale price Rs. 340.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Engineerchi Gosht By Vishal Avachite इंजिनिअरची गोष्ट विशाल अवचिते

स्वतःच्या जीवनप्रवासातील अनुभवांमधून धडे घेत, विशाल अवचिते यांचे है पुस्तक तरुण इंजिनिअर्स आणि तमाम विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांसाठी, एक प्रेरणादायी मार्गदर्शक ठरेल. सर्वसमावेशक भारतासाठी अतिशय गरजेचे असे हे पुस्तक आहे. - पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, शास्त्रज्ञ महाराष्ट्राला उद्योगधंद्यांचं केंद्र बनवताना राज्यातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी देणं ही आमची प्राथमिकता आहे. परंतु तरुणांनी या संधींचं सोनं करण्यासाठी योग्य तयारी आणि आत्मविश्वास जोपासणं गरजेचं आहे. हे पुस्तक वाचून महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला आपल्या करिअरमध्ये नव्या उंची गाठता येतील, असा विश्वास वाटतो. -मा. उदयजी सामंत, उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य हे पुस्तक एक प्रेरणा आहे, एक दिशा आहे आणि भविष्य घडवण्याचा आराखडा आहे. यामध्ये फक्त यशाची कहाणी नाही, तर यश मिळवण्यासाठी लागणाऱ्या तयारीची सूत्रं आहेत. मराठी साहित्याच्या क्षेत्रात हे पुस्तक एक वेगळा आणि अलौकिक ठसा उमटवेल, याची मला खात्री आहे. - (प्रस्तावनेतून) डॉ. नरेंद्र जाधव, प्रख्यात अर्थतज्ज्ञ, प्रसिद्ध लेखक राष्ट्रपती नियुक्त मा. राज्यसभा सदस्य आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू असंख्य प्रकारच्या न्यूनगंडांनी पछाडलेल्या (खास करून ग्रामीण भागातील) तरुण मुलामुलींना आत्मविश्वास वाढण्यासाठी साहाय्यभूत ठरणारे हे पुस्तक म्हणजे आपल्या व्यावसायिक यशाच्या शिखरावर जाण्यासाठीचे बायबल वाटले तर नवल नाही