Endgame S.Hussain Zaidi
बीएसएफ’चे स्पेशल डायरेक्टर जनरल सोमेश कुमार यांना संरक्षण देण्याचं काम या गुरू-चेल्यावर सोपवण्यात आलं आहे. कुमार हे माजी पंतप्रधान परमेश्वर नायडू यांना भेटायला येण्याच्या मार्गावर आहेत. नायडूंच्या गाडीला अपघात झाल्यामुळेते हॉस्पिटलमध्ये आहेत. कुमारांच्या गाड्यांच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला करतात आणि कुमारांना ठार मारण्यात ते यशस्वी होतात. ‘मोसाद’मधल्या मित्राकडून टीप मिळाल्यावर गुरू-चेला मुंब्याला पोचतात. इथे एका भाड्याच्या घरात अल मुकादम हा मुख्य संशयित लपून बसला आहे. तो त्यांच्या हातावर तुरी देतो, पण तत्पूर्वी तो दुसरा तिसरा कोणी नसून आयुब म्हणजे मजहर खान या त्यांच्या खबऱ्याचा भाऊ आहे, हे विक्रांतच्या लक्षात येतं. केसमधली गुंतागुंत वाढत जात असताना मेजर डॅनिएल; म्हणजे नायडूंची मुलगी वैशाली हिचा प्रियकर, त्यांच्याशी संपर्क साधतो. नायडूंच्या अपघातामागे काहीतरी काळंबेरं असल्याचा दावा तो करतो.राजकारण, कल्पनातीत दगाबाजी आणि अविश्वसनीय थरार याची गुंफण अर्थात….एन्डगेम