Skip to product information
1 of 2

Payal Books

Em Ani Hoomrao by Jerry Pinto, Shanta Gokahle एम आणि हुमराव- जेरी पिंटो

Regular price Rs. 310.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 310.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Em Ani Hoomrao by Jerry Pinto, Shanta Gokahle

एम आणि हुमराव- जेरी पिंटो 

मुंबईत राहणाऱ्या एका गोवन ख्रिश्चन कुटुंबाच्या परस्पर नात्याचे पदर उलगडून दाखवणारी ही कादंबरी आहे. मानसिक आजाराने त्रस्त असलेली, आजाराच्या भरात अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न करणारी आणि तरीही आपल्या नवऱ्यावर, मुलांवर मनापासून प्रेम करणारी, आजाराचा भर ओसरला की आयुष्य समरसून जगण्याचा प्रयत्न करणारी, आनंदी राहणारी आणि इतरांनाही आनंदी करू पाहणारी इमेल्डा म्हणजेच एम, तिच्यावर निरतिशय प्रेम करणारा तिचा पती ऑगस्टीन आणि त्यांची दोन तरुण मुलं यांच्यातल्या सहज-सुंदर नात्याची कहाणी सांगणारी ही कादंबरी. प्रेमाने आपल्या आईला ‘एम’ हाक मारणारी मुलं वडिलांना मात्र, मुलांच्या कोणत्याही प्रश्नाला ‘हूँ’ असे उत्तर देण्याच्या त्यांच्या सवयीमुळे, गमतीने ‘हुमराव’ अशी हाक मारतात.

त्रयस्थपणे लिहिली असली तरीही या कादंबरीला लेखक जेरी पिंटो यांच्या आयुष्यातील घटना-प्रसंगांचा आधार आहे. सुरुवातीला आईच्या आठवणी लिहाव्यात या हेतूने केलेल्या या लेखनाला जेरी पिंटो यांनी नंतर कादंबरीचे रूप दिले. जेरी पिंटो यांची शैली वैशिष्ट्यपूर्ण आहे. एमचा आजार आणि त्यातून तिला होणारा त्रास, तिचं दुःख आणि संपूर्ण कुटुंबाला सोसावा लागणारा संघर्ष हे सगळे व्यक्त करतानाही जेरी पिंटो यांची शैली प्रसन्न, भावपूर्ण आहे. आईविषयीचे प्रेम, तिच्या त्रासाने कळवळणारी तिची मुलं, वडिलांची मूक सोशिक वृत्ती व्यक्त करताना जेरी पिंटो यांची शैली भावुक होते पण त्यात आत्मदयेचा लवलेशही येत नाही, उलट काही भावनिक प्रसंग रंगवताना त्यांनी प्रसन्न विनोदाचाही वापर केल्यामुळे अतिशय गडद दुःखाचे प्रसंगही काहीसे हलके होतात.

मूळ इंग्रजी कादंबरीचा शांता गोखले यांनी केलेला अनुवाद वाचनीय झाला आहे.