Skip to product information
1 of 2

Payal Books

Ekun Kavita Dilip Purshottam Chitre Yanchi Samagra Kavita एकूण कविता : दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची समग्र कविता – दिलीप पुरुषोत्तम चित्रे

Regular price Rs. 1,275.00
Regular price Rs. 1,500.00 Sale price Rs. 1,275.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

नव्या मराठी कवितेची समृद्धी कळून येण्यासाठी रा. चित्रे यांची कविता समजून घेणे अपरिहार्य आहे. त्यांनी मराठी कविता खऱ्या अर्थाने भावोत्कट केली.. नवी शब्दकळा कवितेत रूढ केली. शब्दकळेचा अतिव्यय हे त्यांचे जगण्याचा उत्सव साजरा करण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. मर्ढेकरोत्तर नवकवींनी रूढ केलेले भावनाप्रधान व विचारप्रधान असे कवितेचे विभाजन अप्रस्तुत ठरावे अशी नवी शैली त्यांनी निर्माण केली. तंत्राचे नानाविध प्रयोग केले. स्वचे अव्यक्तीकरण करून संवेदनांचे सरळ भाषांकन करणे, भाषेला सतत कवितेच्या सार्वभौमत्वाचे भान देणे, शब्दाच्या विविध गुणांचा जल्लोष उमटवत राहणे हे त्यांच्या कवितेचे विशेष मराठी कवितेला वळण देणारे ठरले.

— भालचंद्र नेमाडे

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची कविता वाचत असताना प्रथमतः जाणवणारी गोष्ट म्हणजे त्यांची शब्दांची निवड. त्या शब्दांची ठेवण, ओळींची मांडणी, लांबी रुंदी शब्दांचा नाद त्यांचे वजन, ओळीमधला ताल, एका ओळीनंतर येणान्या दुसऱ्या ओळीचे निर्माण केलेले आंदोलन, लय शब्द आणि ओळींच्या मांडणीतून निर्माण झालेले संगीत, संगीताचे संदर्भ, संगीताच्या प्रतिमा चित्रात्मकता, साहित्याचे संगीताचे चित्रकृतींचे शहरांचे-वस्त्यांचे वस्तूंचे रस्त्याचे असंख्य संदर्भ

— वसंत आबाजी डहाके

दिलीप चित्रे हे खऱ्या अर्थाने समकालीन कवी आहेत. मी आणि विश्व यांच्या परस्परसंबंधाचा आमूलाग्र नावीन्यपूर्ण आणि अतोनात विचार मांडणारी अस्तित्ववादी जीवनदृष्टी अब्सडिटीची जाणीव तसेच पराकोटीची गुंतागुंत व्यक्त करणारी वैचारिक, भावनिक स्थिती हे समकालीन साहित्याचे विशेष आहेत. चित्रे यांच्या कवितेत हे विशेष प्रकर्षाने आढळतात.