Skip to product information
1 of 2

Payal Books

Ekek Pan Galavaya Aani Nantar... |एकेक पान गळावया आणि नंतर.. Author: Dr. Pushpalata Rajapure-Tapas| डॉ. पुष्पलता राजापुरे- तापस

Regular price Rs. 178.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 178.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

स्त्री-पुरुष  संबंधातील ताण हे मुख्यत: पारंपरिक समाजव्यवस्था, पुरुषी मनोवृत्ती, जुन्या-नव्याचा संघर्ष, परंपरा, रूढी यामुळे निर्माण होत आले.

स्त्रीच्या दु:खाचे असे विविध स्वरूपी अकार भूत-वर्तमान व भविष्य अशा तिहेरी कालाच्या चौकटीत तपासून पाहाण्याचं कार्य अनेक लेखिकांनी सुरू केलं होतं. त्या सर्वांमध्ये गौरी देशपांडे वेगळ्या तर्‍हेनं प्रस्थापित व्यवस्थेचं स्वरूप मांडू पाहत होत्या.

समानतेच्या व सामाजिक न्यायाच्या तत्त्वज्ञानाची उभारणी करून नव्या समाजव्यवस्थेची निकड जाणवून देणं हे स्त्रीवादाचं अंगभूत कार्य आहे. हे कार्य स्त्रीवादी साहित्य आणि स्त्रीवादी चळवळी पार पाडत असतात. हे मान्य केलं तर;

गौरी देशपांडे यांच्या साहित्यातील वैशिष्टपूर्ण पात्ररचनेतून व त्या पात्रांच्या उक्तिकृतीतून याचा पाठपुरावा झाला आहे, असं म्हणावं लागेल