Skip to product information
1 of 2

Payal Books

Eka Samrudha Shalecha Pravas By Kabir Vajpeyi Translated By Vinita Ganbote

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

पुस्तकाविषयी

शाळेचा संपूर्ण परिसरच एक शैक्षणिक साधन बनावे म्हणून मुलांच्या अवतीभवती अनेकविध कल्पकतापूर्ण गोष्टी अंतर्भूत कराव्यात, यासाठी वाचकांना उत्स्फूर्त करण्याचे काम हे पुस्तक करते. मुलांचा तसेच शिक्षकांचाही विचार करून या सर्व कल्पना साध्या-सोप्या प्रकारे, हसत-खेळत वापरता येतील अशा असून, त्या महागड्या नाहीत.

 कल्पक शिक्षक, इंजिनियर, आर्किटेक्ट तसेच संस्थाचालकांच्या व अधिकार्‍यांच्या सहाय्याने अस्तित्वात असलेल्या शाळेच्या वास्तूतसुद्धा ‘बाला’च्या कल्पनांचा अंतर्भाव करता येईल. शिक्षणपद्धतीतील भौतिक, तांत्रिक, संस्थेच्या अधिकारक्षेत्रातील विचारपरिवर्तनामुळे हे शक्य होऊ शकते. या पुस्तकात भौतिक क्षेत्रावर भर देण्यात आलेला असून, वाचक व इतर संबंधित याचा मतितार्थ व इतर क्षेत्रातील संबंध समजून स्वत:च्या परिने त्याचा वापर करतील.

 कुठलीही शाळा, मग ती खेड्यातील असो, गावातील असो वा शहरातील असो, त्याच्या निर्मितीप्रक्रियेत अनेक लोकांचा सहभाग असतो. सरकार शाळेला परवानगी देते, संस्था त्यासाठी जागा उपलब्ध करते, आर्किटेक्ट तिचा आराखडा तयार करतात, मजूर व गवंडी ती बांधतात, इंजिनियर कामाची देखरेख ठेवतात, शिक्षण खाते त्याची पाहणी करते, व्यावसायिक प्रशिक्षक प्रशिक्षण देतात, अभ्यासक्रम आखला जातो, पुस्तके छापली जातात व मगच शिक्षक प्रत्यक्ष वर्गात शिकवतात.

 बर्‍याच वेळा या वेगळ्यावेगळ्या यंत्रणा व व्यक्ती स्वतंत्रपणे काम करतात. त्यामुळे मुलांसाठी आवश्यक असलेला शिक्षणातील सुखद अनुभव हिरावून घेतला जातो. या सर्व संबंधितांना शाळेच्या कामाकडे सर्वंकष दृष्टीने पाहून सहकार्याने काम करण्याची संधी या पुस्तकामुळे मिळेल.

 

या पुस्तकाचा हेतू व उपयोग

प्राथमिक शिक्षणाबाबत कोणतेही नियोजन करताना व अमलात आणताना मुले व शिक्षक यांचा प्रामुख्याने विचार करावा, असे हे पुस्तक सांगते. प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ती व संस्थांनी या पुस्तकातील संकल्पना पाहून त्यात गरजेनुसार बदल करावा. या व्यक्ती व संस्था म्हणजे :

* शाळेतील शिक्षक, पालक व खासगी शाळांचे संचालक.

*  आर्किटेक्ट व इंजिनियर (आराखडा व बांधकाम संदर्भात).

* संस्था, गाव व जिल्हा पातळीवरचे शिक्षण                           समन्वयक.

* राज्य वा जिल्हा स्तरावरचे नियोजक व अधिकारी.

* राज्य वा राष्ट्रीय स्तरावरचे शिक्षणविषयक धोरण ठरवणारे अधिकारी.

 हे सर्व मिळून आपल्या कार्यक्षेत्राच्या अखत्यारित, शिक्षणाला पूरक अशा योजना तयार करून शाळेच्या परिसराचा बाह्यांगीण विकास करून ते एक शैक्षणिक साधन बनवू शकतात.

 उदाहरणार्थ, राज्य वा राष्ट्र पातळीवरील धोरण ठरवताना शाळेच्या बाह्यांगीण विकासाचा विचार करून आवश्यक बदल घडवावेत. योग्य शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी व शाळेच्या परिसरातील कोणत्या घटकांचा विकास करता येईल याचे मार्गदर्शन हे पुस्तक करेल. शाळेच्या परिसराचा अर्थपूर्ण व शिक्षणाला पूरक उपयोग होण्यासाठी व त्याला साकार करण्यासाठी आर्किटेक्ट व इंजिनिअर यांचीही मदत होईल. पालक व शिक्षण-संस्थाचालकांना या पुस्तकात त्यांच्या शाळेसाठी वापरता येतील अशा असंख्य कल्पना सापडतील. शिक्षकांना तर उपलब्ध जागेचा व साधनांचा योग्य वापर करण्यासाठी कल्पनांचे भांडारच या पुस्तकात सापडेल.

 या पुस्तकात अभिनव कल्पनांचा खजिनाच आहे. वेगवेगळ्या प्रकारे योजना करून त्या अमलात आणण्याच्या पद्धतींचाही येथे परामर्श घेतला आहे. राष्ट्र व राज्य पातळीवरील सरकारी योजनांची यादी जी ‘बाला’च्या संकल्पना राबवताना उपयोगी पडेल व त्यासाठी आवश्यक संस्था व तांत्रिक सहाय्याची ही यादी यात दिली आहे.

 

 

"Building as Learning Aid - Bala –

इमारत / वास्तू : एक शैक्षणिक साधन’ ही अभिनव कल्पना सध्या भारतात रुजली असून, मोठ्या प्रमाणात लक्षवेधी ठरली आहे. व्यक्तीच्या विकासात, सामाजिक अस्तित्व व सहभागात तसेच ज्ञानार्जनाद्वारे वैश्‍विक नागरिक तयार करण्यात शाळांचा वाटा बहुमोल आहे. मुलांच्या वाढीच्या व व्यक्तिमत्त्व विकासाच्या अत्यंत संवेदनशील टप्प्याला आकार देताना काळजीपूर्वक पालन-पोषण व नावीन्यपूर्ण हाताळणी यांची नक्कीच गरज आहे. शैक्षणिक गुणवत्ता, मुलांच्या जिज्ञासेला व कल्पनाशक्तीला वाव देणे व समभावाने जगणे हे शिकविण्यात शाळेच्या परिसराचा मोठा वाटा असतो. दुर्देवाने शाळेच्या बांधकामाच्या वेळी या सर्वांचा विचार केला जात नाही. हे सर्व लक्षात घेऊन ‘बाला’ने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुलांच्या, शिक्षकांच्या व समाजाच्या शाळेसंदर्भातील गरजा व अपेक्षा लक्षात घेऊन शाळेच्या इमारती व परिसर यासाठी अनेक प्रकारच्या संकल्पना ‘बाला’ने सुचविल्या आहेत. या संकल्पना शाळेच्या परिसरातील गरजांनुसार, मुलांची संवेदनशीलता लक्षात घेऊन शैक्षणिक व अध्यापन शास्त्रासाठी अर्थपूर्ण व उपयुक्त ठरतील.

उदाहरणार्थ, सध्याच्या शाळांचे बांधकाम करताना मुलांचा विचार केला गेला नाही; परंतु ‘बाला’ खेळीमेळीच्या वातावरणात प्रश्‍न उपस्थित करून त्याच्या उत्तरांतून गरजा लक्षात घेऊन एक प्रमाणबद्ध चित्रण करून नवीन संकल्पनांना जन्म देते.

यातील बर्‍याचशा संकल्पना व पद्धती भारतात अनेक ठिकाणी यशस्वीपणे वापरल्या गेल्या असून, सरकारी व इतर संस्थांकडून सहाय्य व प्रोत्साहन मिळविण्यास समर्थ ठरल्या आहेत. अशा व्यक्ती, संस्था, शिक्षणाधिकारी सर्वांनाच या पुस्तकामुळे त्यांच्या कामात मदत होईल, तसेच नव्या कल्पनांचा विचार करून त्या सहकार्याने अमलात आणता येतील.

 

लेखका विषयी  

कबीर वाजपेयी हे एक वास्तुविशारद आहेत. खेड्यातील तसेच शहरातील शाळांमध्ये अध्ययन व अध्यापन यासंबंधी विकास कसा करता येईल, याविषयी त्यांचा अनुभव मोठा आहे. नगर नियोजक व वास्तुविशारद असलेल्या आपल्या पत्नीसमवेत त्यांनी

‘विन्यास’ ही संस्था स्थापन केली. शिक्षणपद्धतीत मूलभूत बदल घडवून ते योग्य प्रकारे समजण्यासाठी, पर्यावरण व मूल्य यांचा विचार करून नवनवीन संकल्पना साकार करणे, शाळेचा परिसर आनंददायी बनविणे हा त्यांचा आवडीचा विषय आहे. खेडोपाडी, दुर्गम प्रदेशातून प्रवास करत लोकांशी चर्चा करणे, छायाचित्रण, संगीत ऐकणे, लेखन, आपला छोटा मुलगा ऋभुबरोबर वेळ घालविणे, अशा नएक गोष्टी करता करता, कधी कधी एकांतवासही त्यांना आवडतो. विविध प्रकल्प, प्रबंध व वास्तुकलेच्या विद्यार्थ्यांना शिकविणे हेही त्यांचे आवडते काम. बांधकाम क्षेत्रातील मिस्त्री/अभियंते यांच्या परस्पर मदतीने तयार होऊ शकणार्‍या संकल्पना याचे प्रशिक्षणसुद्धा ते देतात. संकल्पना तयार करणे व त्याची साधननिर्मिती या संदर्भात भारत सरकार, युनिसेफ, युनेस्को, युएनडीपी, डीएफआईडी, जीटीजेड, आगाखान फाउंडेशन, हुडको यांना त्यांनी परामर्श व सल्ला दिला आहे. दिल्ली येथे पत्नी प्रीती, मुलगा व आई-वडील यांच्यासमवेत ते राहतात.