Payal Books
Eka punarjanmachi kathaऐका पुनजन्माचा कथाडॉ.--- मनोज भाटवडेकर
Couldn't load pickup availability
एक होता तज्ज्ञ डॉक्टर. तो एका दुर्धर रोगाने आजारी पडला. त्याने इमानेइतबारे वैद्यकीय उपचार घेतले. पण उपचारांना आलेलं यश मर्यादित होतं. त्याचं मन आजाराशी झगडत होतं...
आणि एके दिवशी वाऱ्याच्या एका झुळुकेने त्याच्या कानात 'कुणाचा तरी' पत्ता सांगितला. त्या 'कुणीतरी' त्याचा हात घट्ट धरला नि म्हटलं, "चल माझ्याबरोबर". एक नवा प्रवास सुरु झाला. या प्रवासात एखादी जादूची फुंकर घातल्याप्रमाणे तो आजारातून बाहेर आला. त्यानंतर त्याचा आजार तर राहिला नाहीच पण तोही पूर्वीचा राहिला नाही.
एक विलक्षण चमत्कार वाटावा असं काहीतरी घडलं. त्याच्या आयुष्यात उत्सव बहरू लागला. तो त्याच्यासाठी पुनर्जन्म होता. हे प्रांजळ कथन आहे याच प्रवासाचं. हे अवलोकन आहे स्वतःचंच... स्वतःच्या नजरेतून केलेलं... आयुष्यातल्या समग्रतेशी नातं जोडायला लावणारं.

