Ek Zunj Sharthichi By Karuna Gokhale
Regular price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 203.00
Unit price
per
पानिपत ही मराठयांच्या इतिहासातील भळभळती जखम. दिल्लीवर जरीपटका फडकवण्याचे स्वप्न पानिपतच्या पराभवामुळे धुळीला मिळाले. मराठयांची उत्तरेकडील घोडदौड थांबली. मात्र पानिपतच्या पराभवाचे तरंग दक्षिणेतही उमटल्यावाचून राहिले नाहीत. मराठयांच्या पराभवाची वार्ता कळताच हैदर अली, निजाम यांना स्फुरण चढले व ते अधिक त्वेषाने मराठयांविरुध्द एकत्र आले. त्याचवेळी दक्षिणेत मोगलांना जिवाच्या कराराने रोखून धरणा-या मराठा सरदारांकडे पानिपतच्या मन्वंतरानंतर पुणे, सातारा व कोल्हापूर या तिन्ही मराठा सत्ताकेंद्रांचे दुर्लक्ष होऊ लागले. तरीसुध्दा तंजावरपर्यंत पसरलेल्या मराठयांनी स्वबळावर हैदर अली, निजाम, इंग्रज आणि पाँडेचरीतील फ्रेंच यांच्याशी झुंज देणे सुरूच ठेवले. या चारही आक्रमकांना जिवात जीव असेपर्यंत तोंड देऊन दक्षिणेतील गुत्तीचे राज्य मराठयांच्या हातून सुटू नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे मुरारीराव घोरपडे हे शेवटचे मराठा सेनापती. हैदरच्या विरोधात त्यांनी दिलेली एकाकी झुंज हा मराठयांच्या शौर्याचा, अतुलनीय घोडदळाचा व त्याचवेळी आपसातील दुफळीचा, फंदफितुरीचा आणि मराठा सत्ताकेंद्रांनी अवलंबलेल्या चुकीच्या धोरणांचा दाखलाच म्हणता येईल.